Government of Maharashtra

महा योजना

logo

श्री देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

 • मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम(MRDWP)
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम(MRDWP)
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र. ग्रापाधो-१११५/प्र.क्र.९२/पापु-०७ दि. ०७ मे, २०१६
  योजनेचा प्रकार : राज्य पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : राज्यातील ग्रामीण जनतेस पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : ग्रामीण भागातील जनतेसाठी
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • १) गावाची लोकसंख्या किमान १००० असावी
 • २) पाणी पुरवठ्याच्या सोयी उपलब्ध नसाव्या
 • ३) हाती घ्यावयाची योजना अन्य कोणत्याही कार्यक्रमामध्ये नसणे
 • ४) योजनांचे त्रयस्थ तांत्रिक परिक्षण करणे अनिवार्य राहील
 • ५) पाणी पुरवठा नळ जोडणी किमान ८०%, मीटर नळजोडणी १००%
 • आवश्यक कागदपत्रे :
 • प्रस्तावित योजनांसाठी महसूल व वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, रेल्वे वा इतर विभागांच्या आवश्यक त्या परवानग्या
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : दरडोई दरदिवशी पाणी पुरवठा
 • • शहरालगतच्या ग्रामपंचायती/वाड्या व वस्त्यांसाठी ७० LPCD
 • • इतर ग्रामपंचायती/ वाड्या व वस्त्यांसाठी ४० LPCD
 • अर्ज करण्याची पद्धत :
   मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद मार्फत
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : २४ महिने
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
 • • सर्व जिल्हा परिषद
 • • महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
 • • पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई
 • १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • राष्‍ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : राष्‍ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र. ग्रापाधो-११०९/प्र.क्र.१०४ (अ)/पापु-०७ दि. 17 मार्च, २०१०
  योजनेचा प्रकार : केंद्र पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : कार्यक्रमांतर्गत स्त्रोत शाश्वती, पाण्याची गुणवत्ताव कुटुंब पातळीवर जल सुरक्षा यावर भर
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : ग्रामीण भागातील जनतेसाठी
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • • १००% घरगुती नळ जोडण्याचा समावेश अनिवार्य
 • • जलस्वराज्य प्रकल्पाच्या धर्तीवर गाव कृती आराखडा तयार करणे
 • • गाव हगणदारीमुक्त होणे इ.
 • आवश्यक कागदपत्रे : प्रस्तावित योजनांसाठी आवश्यक त्या जमिनीचे संपादन, महसूल व वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, रेल्वे वा इतर विभागांच्या आवश्यक त्या परवानग्या
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : गावातील सर्व नागरीकांना घरोघरी किमान ४० LPCD पाणी उपलब्ध करुन देणे
  अर्ज करण्याची पद्धत :
   ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने प्रस्तावित योजना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करावी
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : ३ वर्षाचा कमाल कालावधी
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
 • • सर्व जिल्हा परिषद
 • • महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
 • • पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई
 • १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविणे
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविणे
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र.नाबार्ड-2014/प्र.क्र.04/पापु-08,दि.14 ऑगस्ट,2014 व शासन निर्णय क्र.नाबार्ड 1514/प्र.क्र.16/पापु-08,दि.8 एप्रिल,2015
  योजनेचा प्रकार : नाबार्ड अर्थसहाय्यित
  योजनेचा उद्देश : राज्यातील 28 गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविणे
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : गाव
  योजनेच्या प्रमुख अटी : शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे
  आवश्यक कागदपत्रे : ग्रामसभा ठराव,प्रकल्प अंदाजपत्रक इत्यादी
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी अर्थसहाय्य
  अर्ज करण्याची पद्धत :
   शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1.5 ते 2 वर्षे
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,सातवा माळा,गोकूलदास तेजपाल रूग्णालय आवार संकुल इमारत,लोकमान्य टिळक मार्ग,मुंबई-400001
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र.अभियान-1008/प्र.क्र.177/पापु-16, दि.15 सप्टेंबर,2008
  योजनेचा प्रकार : राज्य पुरस्कृत (योजनांतर्गत)
  योजनेचा उद्देश : ग्रामीण भागातील परिसर स्वच्छ होऊन नागरिकांचे आरोग्यमान व पर्यायाने जीवनमान उंचावणे.स्वच्छतेतून समृद्धीकडे ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : ग्रामपंचायत
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे
 • आवश्यक कागदपत्रे : ग्रामसभेद्वारा अभियानाची सुरुवात करण्यात येते.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : स्वच्छतेच्या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणा-या ग्रामीण स्वराज्य संस्थांनी बक्षीस स्वरुपात रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येतात.
  अर्ज करण्याची पद्धत :
   शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 वर्ष
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित जिल्हा परिषद तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,सातवा माळा,गोकूलदास तेजपाल रूग्णालय आवार संकुल इमारत,लोकमान्य टिळक मार्ग,मुंबई-400001
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
  टिप:- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या प्रक्रियेस सद्यस्थितीत स्थगिती देण्यात आली असून सदर योजनेमध्ये सुधारणा करून सुधारित योजना मान्यतेसाठी प्रस्तावित करण्यात आली आहे.मान्यता प्राप्त झाल्यावर सुधारित संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल.
 • स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र.स्वभामि-2014/प्र.क्र.28/पापु-08,दि.7 नोव्हेंबर,2014 व दि.10 नोव्हेंबर,2014
  योजनेचा प्रकार : केंद्र पुरस्कृत (फ्लॅगशीप कार्यक्रम)
  योजनेचा उद्देश : महाराष्ट्र राज्याचा ग्रामीण भाग हगणदारीमुक्त करणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : दारिद्र्यरेषेखालील सर्व कुटुंबे तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,शारीरीक अपंग, महिला, सीमांत, अल्प भूधारक शेतकरी,भूमिहीन परंतू स्वत:चे घर असलेला मजूर आणि महिला प्रमुख असलेली कुटुंबे
  योजनेच्या प्रमुख अटी : यापूर्वी शौचालयाचा लाभ घेतलेला नसावा. तसेच रकाना 5 मधील प्रवर्गातील असावा.
  आवश्यक कागदपत्रे : दारिद्र्यरेषेखालील कार्ड,संबधित प्रवर्गाचे प्रमाणपत्र.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : वैयक्तिक शौचालय बांधकाम व त्याचा नियमित वापर करण्यासाठी रु.12,000/- प्रोत्साहन अनुदान
  अर्ज करण्याची पद्धत : ग्रामपंचायतीकडे लेखी स्वरुपात अर्ज सादर करणे
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 30 ते 45 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,सातवा माळा,गोकूलदास तेजपाल रूग्णालय आवार संकुल इमारत,लोकमान्य टिळक मार्ग,मुंबई-40001
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी नागरी दलितवस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी नागरी दलितवस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय : नादव-2010/प्र.क्र.219/पापु-22, दि.25/6/2010
  योजनेचा प्रकार : राज्य शासन योजना- मागणी आधारीत
  योजनेचा उद्देश : नागरी क्षेत्रातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांमधील कुटुंबियांना खाजगी नळ जोडण्या व वैयक्तिक शौचालये उपलब्ध करुन देणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : नागरी भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील कुटुंब
  योजनेच्या प्रमुख अटी : नागरी भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटक
  आवश्यक कागदपत्रे : मुख्याधिकारी, संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांना अर्ज
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : या योजनेअंतर्गत नागरी भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील कुटुंबियांना खाजगी नळ जोडण्यांसाठी रु.4,000/- प्रतिकुटुंब आणि वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी रु.12,000/- प्रतिकुटुंब याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय आहे.
  अर्ज करण्याची पद्धत : मुख्याधिकारी, संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांचेमार्फत
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : सहा महिने
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : मुख्याधिकारी, संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांचे कार्यालय
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: मुख्याधिकारी, संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांचे संकेतस्थळ
 • नागरी भागातील दलित वस्त्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी नागरी दलित वस्ती पाणी पुरवठा योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : नागरी भागातील दलित वस्त्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी नागरी दलित वस्ती पाणी पुरवठा योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्रमांक :- नादपि-२००४/प्र.क्र.२८/पापु-२२, दिनांक २५ ऑगस्ट, २००६
  योजनेचा प्रकार : विशेष घटक योजना ( SCSP )
  योजनेचा उद्देश : नागरी क्षेत्रातील दलित वस्त्यांमध्ये अथवा दलित लोकसंख्या मोठया प्रमाणावर असणा-या नागरी भागातील आरक्षित वार्डासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अनुसूचित जाती ( Scheduled Caste )
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • १) ही योजना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या क्षेत्रातील अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभागामध्ये राबविण्यात यावी.
 • २) जर या आरक्षित प्रभागामध्ये पाणी पुरवठयाची पर्याप्त सुविधा अस्तित्वात असेल तर शहरातील अन्य प्रभागापैकी ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द यांची लोकसंख्या किमान १५० आहे तिथे राबविण्यात यावी.
 • ३) प्राधान्य देताना जिथे जास्त अनुसूचित जातींची लोकसंख्या आहे त्या प्रभागाला प्रथम प्राधान्य देण्यात यावे व त्यानंतर उतरत्या क्रमाने प्रभाग निवडावा.
 • ४) ही योजना अशा दलित वस्तीमध्ये राबविता येईल जेथे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या श्रेणीनुसार शासनाच्या दरडोई पाणी पुरवठयाच्या निकषापेक्षा कमी किंवा अनियमित पाणी पुरवठा होतो.
 • ५) या योजनेंतर्गत हाती घ्यावयाच्या कामांसाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वर्गवारीनुसार खालीलप्रमाणे कमाल शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल.
 • अ.क्र. नागरी स्थानिक स्वराज्य संस्था कमाल अनुज्ञेय अनुदान
  महानगरपालिका रु.३२.०० लक्ष
  ' अ ' वर्ग नगरपरिषद रु. १५.०० लक्ष
  ' ब ' वर्ग नगरपरिषद रु. १२.०० लक्ष
  ' क ' वर्ग नगरपरिषद रु.१०.०० लक्ष
 • आवश्यक कागदपत्रे : सदर योजना ही वैयक्तिक लाभाची नसून सामूहिक लाभाची आहे.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • अ) दलित वस्तीकरीता पाण्याचे स्त्रोत, नविन स्त्रोत किंवा अस्तित्वातील स्त्रोताचे बळकटीकरण करणे ( पाउसपाणी संकलनाचा यात समावेश राहील )
 • आ) दलित वस्तीकरीता स्त्रोतावरुन पाणी आणण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री ( मोटर पंप इत्यादी )
 • इ) दलित वस्तीसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची टाकी (ESR)/साठवण टाकी
 • ई) दलित वस्तीतील दलितासाठी वितरण व्यवस्था
 • उ) तांत्रिक सुधारणा करुन जर अस्तित्वातील योजनेतून दलित कुटूंबांना योग्य पाणी मिळेल अशा सुधारणा.
 • ऊ) याव्यतिरिक्त दलित कुटूंबांना पाणी मिळण्याच्या दृष्टीने दलित वस्ती पाणी पुरवठा प्रकल्प अंमलबजावणी समितीने सूचविलेली आवश्यक कामे घेणे.
 • अर्ज करण्याची पद्धत : सदर योजना ही वैयक्तिक लाभाची नसून सामूहिक लाभाची आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : त्या- त्या आर्थिक वर्षातील आर्थीक वर्ष संपेपर्यत ( दिनांक १ एप्रिल ते ३१ मार्च पर्यंत )
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : जिल्हयातील संबंधित महानगरपालिका व नगरपरिषद
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: संबंधित महानगरपालिका व नगरपरिषद यांचे संकेतस्थळ
एकूण संकेतस्थळाला भेटी
एकूण संकेतस्थळाला भेटी