Government of Maharashtra

महा योजना

logo

श्री देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री

पर्यटन विकास व सांस्कृतिक विकास विभाग

 • आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे आयोजन करणा-या संस्थांना अर्थसहाय्य देण्याबाबतचे धोरण
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे आयोजन करणा-या संस्थांना अर्थसहाय्य देण्याबाबतचे धोरण
  योजने बद्दलचा शासन निर्णय : आंचिम-2011/प्र.क्र.158/सां.का.1 दि.18 ऑक्टोबर 2012.
  योजनेचा प्रकार : अर्थसहाय्याची योजना.
  योजनेचा उद्देश : आंतरराष्ट्रीय/ राष्ट्रीय/ राज्य स्तरावर पुरस्कारप्राप्त दर्जेदार चित्रपट सामान्य जनतेपर्यंत नेऊन त्यांची अभिरुची वाढविणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे आयोजन करणा-या व शासन निर्णयातील अटी व शर्तींची पुर्तता करणा-या नोदंणीकृत संस्थां.
  योजनेच्या प्रमुख अटी : अर्थसाहाय्य निधीच्या उपलब्धतेनुसार मंजूर केले जाईल. आयोजन संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे किमान 3 वर्षापूर्वी नोंदणीकृत असावी. संस्थेने लिखित घटना प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक राहील. संस्थेचे मागील 3 वर्षांचे सनदी लेखापालांचे लेखा विषयक अहवाल सादर करणे आवश्यक राहील. आयोजन संस्था ना नफा ना तोटा या तत्वावर कार्यरत असावी. लघुपट, माहितीपट, ॲनिमेशनपट तसेच पूर्ण लांबीचे चित्रपट यांचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तसेच निव्वळ मराठी चित्रपटांचा महोत्सव आयोजित करणा-या संस्थांना सदर अनुदान अनुज्ञेय राहील. आयोजन संस्थेचे उद्दिष्ट हे चित्रपट कलेचा प्रसार, प्रचार, संवर्धन आणि त्यामाध्यमातून कला व संस्कृतिचे प्रदर्शन तसेच ओळख / माहिती करुन देणे असावे. चित्रपट महोत्सवात प्रदान करण्यात प्रदान करण्यात येणा-या पुरस्कार/सन्मान समितीवर शासनाचा किमान एक प्रतिनिधी संस्थेने नेमणे आवश्यक राहील. चित्रपट महोत्सवाची जाहिरात, निमंत्रणपत्रिका इ. माध्यमातून "सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सहयोगाने" असा ठळक उल्लेख करणे आवश्यक आहे.
  आवश्यक कागदपत्रे : वरील अटींची पुर्तता करत असलेली कागदपत्रे, संस्थेच्या कार्याचा किमान 3 वर्षांचा अहवाल. महोत्सवासंदर्भात छापून आलेल्या जाहिराती, लिखित साहित्य, वृत्तपत्रीय कात्रणे, छायाचित्रे इ. पुरावे सादर करणे आवश्यक राहील.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : प्रथम येणा-यास प्रथम या तत्वावर विहीत निकषांची पुर्तता करणा-या, जास्तीत जास्त 10 संस्थांना प्रत्येकी रपये5.00 लाख याप्रमाणे सहाय्यक अनुदान मंजूर करण्यात येईल.
  अर्ज करण्याची पद्धत :
   महोत्सवाचे प्रस्ताव संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत सादर होणे आवश्यक आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : संस्थेकडून आवश्यक त्या सर्व कागपत्रांची पूर्तता होण्यास लागणारा कालावधी यानुसार.
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत योजना.
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत योजना.
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शा.नि.क्र. मचिअ-2012/प्र.क्र.141/सां.का.1 दि.30 ऑक्टोबर 2013.
  योजनेचा प्रकार : अर्थसहाय्याची योजना.
  योजनेचा उद्देश :
 • दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन देणे.
 • योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्वांसाठी लागू .
  योजनेच्या प्रमुख अटी : या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यात वास्तव्य असावे. चित्रपट परिक्षण समितीने परिक्षणाअंती निश्चित केलेला दर्जा अंतिम असेल. कोणत्याही चित्रपटाचे पुन:परिक्षण केले जाणार नाही. अर्थसहाय्यासाठी सादर झालेल्या प्रत्येक चित्रपटाचे किमान रुपये 1.00 लाख भाडे शुल्काएवढे चित्रीकरण गोरेगांव चित्रनगरी किंवा कोल्हापूर चित्रनगरी येथे करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्या चित्रपटाच्या अर्थसहाय्यातून रुपये 1.00लाख एवढी कपात केली जाईल. सदर योजनेतील नियमात बदल करणे, सुधारणा करणे किंवा अर्थ लावणे याबाबतचे पूर्ण अधिकार शासनास राहतील. याबाबत शासनाचे आदेश अंतिम आणि संबंधितांवर बंधनकारक राहतील.
  आवश्यक कागदपत्रे : महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने विहित केलेल्या नमून्यात अर्ज व त्यासोबत चित्रपट कथा, पटकथा, संवादाची प्रत आणि रिळे डिव्हीडीज/डिसीपी (डिजीटल सिनेमा पॅकेज) आणि सनदी लेखापालाने प्रमाणित केलेले नफा तोटा व ताळेबंद व इतर संबंधित कागदपत्रे.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : आर्थिक
  अर्ज करण्याची पद्धत :
   महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांचेकडे, त्यांनी विहित केलेल्या नमून्यातील अर्ज करावा.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : निर्मात्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पुर्तता होण्यास लागणा-या कालावधीवर अवलंबून.
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगांव (पश्चिम), मुंबई-65.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • जिल्हा पातळीवर बंदिस्त नाट्यगृह बांधण्यास अर्थसहाय्य योजना.
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : जिल्हा पातळीवर बंदिस्त नाट्यगृह बांधण्यास अर्थसहाय्य योजना.
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शा.नि.क्र.नागृबा-2015/प्र.क्र.85/सा.का.1 दि.29 फेब्रुवारी 2016.
  योजनेचा प्रकार : अर्थसहाय्याची योजना.
  योजनेचा उद्देश :
 • ज्या जिल्हयात बंदिस्त नाट्यगृह अस्तित्वात नाहीत अशा जिल्ह्यांमध्ये नवीन बंदिस्त नाट्यगृह बांधणे.
 • योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : निश्चित असा प्रवर्ग नाही.
  योजनेच्या प्रमुख अटी : नाट्यगृहाचे संपूर्ण बांधकाम जास्तीत जास्त दोन वर्षाच्या कालावधीत पुर्ण करणे अनिवार्य असेल. संस्थेने व्यवस्थापन, देखभाल व दुरुस्तीसाठी राखीव निधी निर्माण करणे आवश्यक राहील.
  आवश्यक कागदपत्रे : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयाकडून प्रमाणित केलेले नाट्यगृह बांधकामाचे अंदाजपत्रक व नकाशे. नाट्यगृह बांधण्याचा व पुढे त्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याचा ठराव. जमीनीची मालकी सिध्द करणारी कागदपत्रे इ.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : आर्थिक
  अर्ज करण्याची पद्धत :
   सबंधित जिल्हाधिकारी यांनी विभागास अर्ज सादर करावा.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : प्रकरणपरत्वे निश्चित नाही.
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : सबंधित जिल्हाधिकारी कार्यालय.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • महाराष्ट्र वैभव स्मारक संगोपन योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : महाराष्ट्र वैभव स्मारक संगोपन योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
 • 1. मवैयो 2005/प्र.क्र.107/सां.का.3, दि.2.2.2007
 • 2. मवैयो 2007/प्र.क्र.107/सां.का.3, दि.20.7.20014
 • योजनेचा प्रकार : स्मारक संगोपन योजना
  योजनेचा उद्देश : राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन व संवर्धनाकरीता व्यक्ती व संस्था यांची मदत मिळविणे
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : व्यक्ती व संस्थां
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  अर्ज करण्याची पद्धत :
  • संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालये, मुंबई
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, सेंट जॉर्ज किल्ला, सेंट जॉर्ज आवार, सी.ए. टी.जवळ, मुंबई
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • महाराष्ट्र राज्यातील वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : महाराष्ट्र राज्यातील वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय : वृकमा 2012/प्र.क्र.117/सां.का.4, दि. 7 फेब्रुवारी, 2014
  योजनेचा प्रकार : मानधन योजना
  योजनेचा उद्देश :
 • साहित्य व कला या क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंताना वृध्दापकाळी आर्थिक बाबींमुळे हालअपेष्टा होऊ नये म्हणून ही योजना सुरु करण्यात आली आहे.
 • योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व
  योजनेच्या प्रमुख अटी : साहित्य कला किंवा वाड्.मय क्षेत्रात 15 ते 20 वर्षे या कालावधीत महत्वपूर्ण कामगिरी
  आवश्यक कागदपत्रे : साहित्य कलाक्षेत्रातील पुरावे, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • अ वर्ग- रु.2,100/- प्रति माह
 • ब वर्ग – रु.1,800/- प्रति माह
 • क वर्ग- रु.1,200/- प्रति माह
 • अर्ज करण्याची पद्धत : गट विकास अधिकारी / समाज कल्याण अधिकारी / अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 3 महिने
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय इमारत, 1 ला मजला, एम. जी. रोड, मुंबई 400 032.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणा-या नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदान
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणा-या नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदान
  योजने बद्दलचा शासन निर्णय : प्रकक्षे/सहाअ 2012/प्र.क्र. 151/सां.का.4, दि. 24 जुलै, 2012
  योजनेचा प्रकार : सहाय्यक अनुदान
  योजनेचा उद्देश :
 • महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कला प्रवाहात राहून त्या टिकविणे, जतन व संवर्धन करणे
 • योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व
  योजनेच्या प्रमुख अटी : संस्था नोंदणीकृत असली पाहिजे, संस्थेच्या घटनेत सांस्कृतिक कार्य हा महत्वाचा उद्देश असावा, 3 वर्षापासून संस्था कार्यरत असावी, संस्थेने कलेच्या क्षेत्रात निशुल्करित्या कार्य करणे आवश्यक,
  आवश्यक कागदपत्रे : मागील 3 वर्षाचा लेखापरिक्षा अहवाल, 3 वर्षात केलेल्या कार्यक्रमाचे पुरावे.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • संस्था अनुदान :- अ वर्ग - रु, 2.00 लाख, ब - वर्ग रु.1.00 लाख व क वर्ग - रु.50,000/-
 • लुप्त होणा-या कला दुर्मिळ साहित्य व विशेष बालकांसाठी कार्यक्रम करणा-या संस्थाना रु.5.00 लाख
 • अर्ज करण्याची पद्धत : जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात येतात. विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांचेकडे प्रस्ताव सादर करणे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 6 महिने
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय इमारत, 1 ला मजला, एम. जी. रोड, मुंबई 400 032.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • राज्यातील लोककलावंतांना अनुदान पॅकेज
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : राज्यातील लोककलावंतांना अनुदान पॅकेज
  योजने बद्दलचा शासन निर्णय : लोकअ 2007/प्र.क्र.127/सां.का.3, दि. 1 जानेवारी, 2008
  योजनेचा प्रकार : अनुदान योजना
  योजनेचा उद्देश :
 • महाराष्ट्रातील सर्व लोककला टिकून राहाव्यात, लोककलेची पुढील पिढींना माहिती व्हावी, लोककलेचे जतन व लोककलेचा उत्तेजन देणे
 • योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • पूर्णवेळ तमाशा फड :- वर्षात 100 खेळ सादर करणारे पथक हंगामी फड :- वर्षात 50 खेळ सादर करणारे कलापथक
 • दशवतार मंडळ :- वर्षात 100 प्रयोग करणारे कलापथक
 • खडीगंमत :- वर्षात 100 प्रयोग करणारे कलापथक
 • शाहिरी कलापथक :- वर्षात 100 प्रयोग करणारे कलापथक
 • लावणी :- किमान 10 वर्षे पारंपारिक लावणी करणारे पथक
 • आवश्यक कागदपत्रे : जाहिरात, हँडबिल, निमंत्रणपत्रिका, तिकिटे, आयोजकाची पत्रे.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • भांडवली अनुदान अ वर्ग :- 10 कलापथक x 2.00 लाख
 • ब वर्ग :- 10 कलापथक x 1.00 लाख
 • क वर्ग :- 20 कलापथक x 50,000
 • ड वर्ग :- 40 कलापथक x 25,000
 • प्रयोग अनुदान पूर्ण वेळ ढोलकी फड / तमाशा फड रु.30,000
 • x 20 प्रयोग 10 कलापथक
 • हंगामी तमाशा फड दशावतारी मंडळे
 • रु.15,000 x 20 प्रयोग 40 कलापथक
 • खडी गंमत शाहिरी, लावणी कलापथके
 • रु.7,000 x 20 प्रयोग 30 कलापथक
 • अर्ज करण्याची पद्धत : संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांचेकडे अर्ज सादर करणे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 6 महिने
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय इमारत, 1 ला मजला, एम. जी. रोड, मुंबई 400 032.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • भारतरत्न पं. भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : भारतरत्न पं. भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय : रासांधो 2010/शासाप्रो 2011/प्र.क्र.306/सां.का.4 दि. 30 जानेवारी, 2013
  योजनेचा प्रकार : शिष्यवृत्ती
  योजनेचा उद्देश :
 • शास्त्रीय संगीतामध्ये शिक्षणा घेणा-या हुशार व गरजु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन कलेच्या शिक्षणास मदत करणे.
 • योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण.
 • आवश्यक कागदपत्रे : मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीचे प्रमाणपत्र, पदवीपर्यंतच्या शिक्षणातील 3 वर्षाचे गुणवत्ता प्रमाणपत्र, घ्यावयाच्या उच्च शिक्षणाची माहिती व कागदपत्रे, कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • रु.5,000/- प्रतिमाह - 2 वर्षासाठी
 • प्रतिवर्षी 12 विद्यार्थी
 • अर्ज करण्याची पद्धत : वर्तमानपत्रात जाहिराती अर्ज मागविण्यात येतात.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 3 महिने
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय इमारत, 1 ला मजला, एम. जी. रोड, मुंबई 400 032.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीतातील नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदान
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीतातील नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदान
  योजने बद्दलचा शासन निर्णय : रासांधो 2010/शासाप्रो 2011/प्र.क्र.306/सां.का.4 दि. 30 जानेवारी, 2013
  योजनेचा प्रकार : संस्थांना सहाय्यक अनुदान
  योजनेचा उद्देश :
 • शास्त्रीय संगीत जनसामान्यात रुजण्यासाठी
 • योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • संस्था पूर्णत: शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्यरत असावी व संस्था नोंदणीकृत असावी. 10 वर्षे या संगीत क्षेत्रात कार्यरत असावी व जनतेसाठी विनामुल्य कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक
 • आवश्यक कागदपत्रे : सनदी लेखापालाकडून 3 वर्षाचे लेखापरिक्षण, संगीत क्षेत्रात 3 वर्षापासून कार्यरत असल्याचा पुरावा.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • प्रत्येक महसुल विभागातून 1 याप्रमाणे 6 संस्थांना प्रत्येकी रु.2.00 लाख
 • अर्ज करण्याची पद्धत : जाहिरात देऊन अर्ज मागविण्यात येतात.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 6 महिने
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय इमारत, 1 ला मजला, एम. जी. रोड, मुंबई 400 032.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
एकूण संकेतस्थळाला भेटी
एकूण संकेतस्थळाला भेटी