Government of Maharashtra

महा योजना

logo

श्री देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री

विशेष सहाय्य

 • इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : केंद्र पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : राज्यातील विधवांना दरमहा निवृत्तीवेतन
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गातील विधवांना लागू आहे.
  योजनेच्या प्रमुख अटी : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या ४० ते ६५ वर्षाखालील वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.२००/- प्रतीमहा व राज्यशासना कडून संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत रु.४००/- प्रतीमहा असे एकूण रु.६००/- प्रतीमहा निवृत्तीवेतन अनुज्ञेय आहे
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.६००/- अदा करण्यात येते.
  अर्ज करण्याची पद्धत : अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना / तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार/तलाठी कार्यालय
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : केंद्र पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : राज्यातील अपंग व्यक्तींना दरमहा निवृत्तीवेतन
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गातील अपंगांना लागू आहे.
  योजनेच्या प्रमुख अटी : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या अपंग लाभार्थ्यांपैकी फक्त १८ ते ६५ वर्षाखालील वयोगटातील ८० % हून जास्त अपंग असलेले किंवा एक किंवा एकापेक्षा जास्त अपंग असलेले किंवा बहूअपंग असलेले (दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेल) लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.२००/- प्रतीमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत रु.४००/- प्रतीमहा असे एकूण रु.६००/- प्रतीमहा निवृत्तीवेतन अनुज्ञेय आहे.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.६००/- अदा करण्यात येते.
  अर्ज करण्याची पद्धत : अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार /तलाठी कार्यालय याठिकाणी अर्ज करु शकतो
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय / तहसलिदार / तलाठी कार्यालय
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • संजय गांधी निराधार अनुदान योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : संजय गांधी निराधार अनुदान योजना
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राज्य पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : राज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.
  योजनेच्या प्रमुख अटी : या योजनेतंर्गत ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग या सारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीय पंथी, देवदासी,३५ वर्षा वरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजने मध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१,०००/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : या योजने खाली पात्र होणा-या कुटूंबात एक लाभार्थी असल्यास रुपये ६००/- प्रतिमहा तर एका कुटूंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास, रुपये ९००/- प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते.
  अर्ज करण्याची पद्धत : अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राज्य पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : राज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा निवृत्तीवेतन
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.
  योजनेच्या प्रमुख अटी :
  • गट (अ) :-६५ व ६५ वर्षा वरील व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या व्यक्तीना श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजना गट (अ) मधून रु.४००/- प्रतिमहिना निवृत्ती वेतन देण्यात येते याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे रु.२००/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्ती वेतन दिले जाते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्यशासना कडून रु.४००/- प्रतिमहा व केंद्रशासना कडून रु.२००/- प्रतिमहा असे एकूण रु.६००/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्ती वेतन मिळते.
  • गट (ब):-या योजनेतंर्गत ज्या व्यक्तीचे वय ६५ व ६५ वर्षावरील आहे व ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये २१,०००/- च्या आत आहे, अशा वृध्दांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (गट- ब) मध्ये रुपये ६००/- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन राज्य शासनाकडून देण्यात येते.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्ती वेतन रु.६००/- अदा करण्यात येते.
  अर्ज करण्याची पद्धत : अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : केंद्र पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : आर्थिक सहाय्य
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे
  योजनेच्या प्रमुख अटी : दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १८ ते५९वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रु.२०,०००/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : एक रकमी रु.२०,०००/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.
  अर्ज करण्याची पद्धत : अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : केंद्र पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : राज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा निवृत्तीवेतन
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.
  योजनेच्या प्रमुख अटी : दारिद्रय रेषेखालील ६५ व ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील. या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.२००/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्ती वेतन देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्यशासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतनयोजने मधून गट (अ) रु.४००/- प्रतिमहा निवृत्ती वेतन मिळते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रुपये ४००/-प्रतिमहा व केंद्र शासनाकडून रुपये २००/- प्रतिमहा असे एकूण रुपये ६००/-प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्ती वेतन मिळते.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्ती वेतन रु.६००/- अदा करण्यात येते
  अर्ज करण्याची पद्धत : अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • आम आदमी विमा योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : आम आदमी विमा योजना
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : केंद्र पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : विमासंरक्षण व शिष्यवृत्ती
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.
  योजनेच्या प्रमुख अटी : ग्रामीण भागातील १८ ते ५९ वयोगटातील भूमिहीन शेत मजूरांना तसेच २.५ एकर पेक्षा कमी बागायती व ५ एकर पेक्षा कमी जिरायती शेतजमीन धारण करणाऱ्यांना या योजनेंतर्गत लाभदेण्यात येतो. वार्षिक विम्याचा हप्ता रु.२००/- इतका असून केंद्र शासना मार्फत रु.१००/- व राज्य शासनामार्फत रु.१००/- इतका विम्याचा हप्ता भारतीय आयुर्विमा महामंडळाला देण्यात येतो
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  • या योजनेंतर्गत खालील प्रमाणे घटना घडल्यास लाभार्थ्यांच्या वारसास / लाभार्थ्यास रक्कम देण्यात येते.
  • • नैसर्गिक मृत्यू - रु. ३०,०००/-
  • • अपघाती मृत्यू - रु.७५, ०००/-
  • • अपघाता मुळे कायमचे अपंग - रु.७५, ०००/-
  • • अपघातामुळे दोन्ही डोळे वा दोन्ही पाय गमावल्यास - रु.७५, ०००/-
  • • अपघातामुळे एक डोळा वा एक पाय गमावल्यास - रु.३७, ५००/- या योजनेंतर्गत लाभार्थ्याच्या नववी ते बारावी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना रु.१००/- प्रतिमहा प्रति विद्यार्थी शिष्यवृत्ती देण्यात येते
  अर्ज करण्याची पद्धत : अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
एकूण संकेतस्थळाला भेटी
एकूण संकेतस्थळाला भेटी