Government of Maharashtra

महा योजना

logo

श्री देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री

अल्पसंख्यांक विभाग : " राज्य अल्पसंख्याक विभागाच्या योजना "

 • पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र. अविवि-2009/ प्र.क्र.188/ 09/का.1, दि. 27.07.2009
  योजनेचा प्रकार : राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : केंद्र शासनाच्या 15 कलमी कार्यक्रमांतर्गत दिलेल्या सूचनांनुसार अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना स्पर्धात्मक परिक्षेमध्ये समान संधी मिळण्यासाठी व राज्यातील पोलीस सेवेमधील प्रमाण वाढविण्यासाठी शासन निर्णय क्र. अविवि-2009/ प्र.क्र.188/ 09/का.1, दि. 27.07.2009 अन्वये महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत सन 2009-10 या वर्षापासून ही योजना राबविण्यात येत आहे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : शासनाने घोषित केलेल्या अल्पसंख्याक प्रवर्गातील 18 ते 25 वर्ष या वयोगटातील उमेदवार
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1.प्रशिक्षणार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु.२.५० लाख यापेक्षा जास्त नसावे.
 • 2.उमेदवार अल्पसंख्यांक समाजातील असावा.
 • 3.उमेदवार १८ ते २५ वयोगटातील असावा.
 • 4.उमेदवारांची उंची पुरुष-१६५ से.मि. व महिला उंची-१५५ सें.मि.,छाती-पुरुष-७९ सें.मि.(फुगवून ८४ सें.मि.)
 • 5.शैक्षणिक पात्रता १२ वी पास.
 • 6.रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयांतर्गत नांव नोंदणी दाखला व ओळपत्राची सत्यप्रत देणे आवश्यक राहील.
 • आवश्यक कागदपत्रे :
 • 1.उत्पन्नाचा दाखला
 • 2. रहिवासी दाखला
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • 1. प्रशिक्षणाचा कालावधी 2 महिन्याचा राहील.
 • 2.प्रशिक्षण खाजगी शैक्षणिक संस्था आणि प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत देण्यात येते.
 • 3.जाहिरातीद्वारे प्राप्त अर्जातील पात्र अल्पसंख्यांक उमेदवारांची निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत करण्यात येते.
 • 4.प्रशिक्षण संस्थांची निवड महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगामार्फत करण्यात येते.
 • 5.प्रशिक्षणामध्ये शिकविण्यात येणारे विषय:-सामान्य ज्ञान, मराठी भाषा आणि शारिरिक क्षमता हे विषय शिकविण्यात येतात.
 • 6.योजनेचा निधी:-शासनाकडून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाला व आयोगाकडून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवड झालेल्या प्रशिक्षण संस्थेला तसेच प्रशिक्षण संस्थेमार्फत अल्पसंख्यांक उमेदवारांना वितरीत करण्यात येतो.
 • अर्ज करण्याची पद्धत : जिल्हाधिकारी यांनी निवड केलेल्या संस्थेने वृत्तपत्रात जाहिरात द्यावी. त्यानंतर उमेदवार त्या संस्थेकडे अर्ज करतात.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : ऑगस्ट – डिसेंबर या कालावधीत प्रशिक्षण आयोजित केले जाते.
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • उर्दू शाळेत मराठी भाषा शिकवणी वर्ग
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : उर्दू शाळेत मराठी भाषा शिकवणी वर्ग
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र. मभायो-2013/प्र.क्र.67/का-9
  योजनेचा प्रकार : राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : केंद्रीय लोकसेवा आयोग / महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अल्पसंख्याक उमेदवारांना यशाच्या पुरेशा संधी उपलब्ध करुन देण्याकरीता आणि त्यासाठी मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व निर्माण करण्याकरीता राज्यातील इंग्रजी माध्यम वगळता इतर अमराठी शाळांमध्ये .8वी, 9वी व 10 वी मध्ये शिकत असलेल्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता सन 2006 पासून मराठी भाषा फौंडेशन वर्ग योजना एैच्छिक स्वरुपात राबविण्यात येत आहे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : 8 वी, 9वी व 10 वी चे अमराठी शाळेतील अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थी
  योजनेच्या प्रमुख अटी : विद्यार्थी अमराठी शाळेतील व अल्पसंख्याक असावेत.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • मानसेवी शिक्षकांची नियुक्ती: -शिक्षणाधिकारी निरंतर यांच्याकडून प्राप्त बीएड/एमएड शिक्षकांची नियुक्ती जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने दरवर्षी करण्यात येते व शिक्षणाधिकारी निरंतर यांच्याकडून निवड झालेल्या शिक्षकांची यादी प्रसिध्द करण्यात येईल.
 • शिक्षकांचे मानधन:-
 • मानसेवी शिक्षकांना प्रती महिना रु. ५,०००/- एवढे मानधन देण्यात येते.
 • शिकविण्यात येणारे विषय:-
 • मराठी व्याकरण, सारांश लेखन, उताऱ्यावरील प्रश्न, दोन व्यक्तींमधील संवाद, गटचर्चा, भाषण कला,पत्रव्यवहार, निबंध लेखन, अर्ज लेखन व अहवाल लेखन हे विषय शाळेच्या वेळेनंतर शिकविण्यात येतात.
 • शासनाकडून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाला व आयोगाकडून जिल्हाधिकारी यांना व तद्नंतर शिक्षण अधिकारी निरंतर यांच्यामार्फत संबंधित शिक्षकांच्या बँक खात्यावर निधी जमा करण्यात येतो.
 • अर्ज करण्याची पद्धत : अमराठी शाळांनी आणि त्यांच्या इच्छेनुसार शिक्षणाधिकारी निरंतर यांच्याकडे त्यावर्षातील 1 जुलै यापूर्वी अर्ज दाखल करणे आवश्यक राहील.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : योजनेचा कालावधी:- दिनांक १ जुलै ते ३१ मार्च असा ९ महिन्यांचा राहिल.
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : योजनेची अंमलबजावणी:- जिल्हाधिकारी यांच्याकडून शिक्षण अधिकारी निरंतर यांच्या मदतीने करण्यात येते.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • अल्पसंख्याकाकरिता हेल्पलाईन
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : अल्पसंख्याकाकरिता हेल्पलाईन
  योजने बद्दलचा शासन निर्णय : हेल्पसु-2009/प्र.क्र.57/का.1, दि.5/2/2009.
  योजनेचा प्रकार : राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : अल्पसंख्याक समुदायातील लोकांना शासकीय कामकाजाबाबत उद्भवणाऱ्या अडचणीचे निरसन करणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अल्पसंख्याक लोकसमूह.
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • अल्पसंख्याकांसाठी खालील तीन हेल्पलाईनस् सध्या कार्यान्वित आहेत केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक मंत्रालयाची खिदमत हेल्पलाईन 1800 112 001
 • (सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार सुट्टीचे दिवस वगळून)
 • राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची हेल्पलाईन 1800 110 088 (सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार सुट्टीचे दिवस वगळून)
 • महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाची हेल्पलाईन 1800 225 786 (सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार सुट्टीचे दिवस वगळून)
  अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
एकूण संकेतस्थळाला भेटी
एकूण संकेतस्थळाला भेटी