Government of Maharashtra

MAHA SCHEMES

logo

Shri Devendra Fadnavis Hon’ble Chief Minister

Law and Judiciary Department

 • धर्मादाय रुग्णालयात / वैद्यकीय केंद्रात निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार देणेबाबत योजना.
  योजनेचे नाव : धर्मादाय रुग्णालयात / वैद्यकीय केंद्रात निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार देणेबाबत योजना.
  योजने बद्दलचा शासन निर्णय : महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ४१ क क अंतर्गत मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका (पीआयएल) क्र.३१३२/२००४ मध्ये क्र. १७ ऑगस्ट, २००६ रोजीच्या अंतरिम आदेशानुसार मंजूर केलेली योजना. सदर रिट याचिकेवर दि.१५ एप्रिल, २००९ रोजी अंतिम आदेश निर्गमित झालेले आहेत.
  योजनेचा प्रकार : वैद्यकीय.
  योजनेचा उद्देश : गरीब रुग्णांना मोफत व दुर्बल घटकातील रुग्णांना सवलतीच्या दराने धर्मादाय रुग्णालयात वैद्यकीय उपचार उपलब्ध होणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : गरीब रुग्ण व दुर्बल घटकातील रुग्ण.
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • गरीब रुग्ण- ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु. ५०,०००/- पर्यन्त आहे.
 • दुर्बल घटकातील रुग्ण - ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु.१,००,०००/- पर्यन्त आहे.
 • आवश्यक कागदपत्रे : शिधापत्रिका / तहसीलदार यांचेकडील उत्पन्नाचे प्रमाणपत्र / दारिद्र्यरेषेखालील पत्रिका.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : गरीब रुग्णांना मोफत व दुर्बल घटकातील रुग्णांना सवलतीच्या दराने संबंधित धर्मादाय रुग्णालयात उपलब्ध असलेले वैद्यकीय उपचार प्राप्त होणे.
  अर्ज करण्याची पद्धत : संबंधित धर्मादाय रुग्णालयात आवश्यक त्या कागदपत्रासहित परस्पर अर्ज दाखल करणे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : -------
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधीत जिल्हाचे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: टीप:- धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या e-governance या कार्यक्रमांतर्गत हॉस्पिटल module go-live झालेले असून charity.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर धर्मादाय रुग्णालयासंबंधित माहिती उपलब्ध होत आहे.
Total Number of Visitors
Total Number of Visitors