Government of Maharashtra

MAHA SCHEMES

logo

Shri Devendra Fadnavis Hon’ble Chief Minister

Minorities Department : " Urdu Academy , Haj Committee , The Waqf Board"

 • उर्दु अकादमी
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : उर्दु अकादमी
  योजने बद्दलचा शासन निर्णय : अल्पसंख्याक विकास विभाग, क्रमांक : उसाअ २०१४/प्र.क्र.२३३/कार्यासन-४, दिनांक : २९ ऑगस्ट, २०१५
  योजनेचा प्रकार : राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : महाराष्ट्र राज्य उर्दु साहित्य अकादमीची स्थापना प्रथमता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.ईयुए-१०७५/एल-जेजे, दि.१६ एप्रिल, १९७५ अन्वये करण्यात आली होती. तद्नंतर वेळोवेळी महाराष्ट्र राज्य उर्दु अकादमीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. अलिकडेच शासन निर्णय, अल्पसंख्याक विकास विभाग, क्रमांक : उसाअ २०१४/प्र.क्र.२३३/कार्यासन-४, दिनांक : २९ ऑगस्ट, २०१५ अन्वये सदर अकादमीची पुनर्रचना करण्यात आलेली असून पुनर्रचित अकादमी पुढीलप्रमाणे आहे-
  अ . क्र . नांव / हुद्दा पद
  शासकीय सदस्य
  मा.मंत्री (अल्पसंख्यांक विकास) अध्यक्ष
  2 मा.राज्यमंत्री (अल्पसंख्यांक विकास) उपाध्यक्ष
  3 प्रधान सचिव (अल्पसंख्यांक विकास विभाग) शासकीय सदस्य
  4 उप/सह सचिव (अल्पसंख्यांक विकास विभाग) शासकीय सदस्य
  ब ) अशासकीय सदस्य
  5 श्री. रऊफ खान मजीद खान, खडका रोड, भुसावळ, जळगांव कार्याध्यक्ष
  6 श्रीमती कमरुन्निसा सईद, हूर विल्ला, पहिला माळा, मराठा मंदिर सिनेमासोर,मुंबई-सेंट्रल, मुंबई-८ सदस्य
  7 श्री. रफीक ए. शेख, ३/९९, जमात चाल, मस्जिद जवळ, मोगापाडा, अंधेरी (पूर्व), मुंबई-६९ सदस्य
  8 श्रीमती एजाज फातेमा पाटणकर, नावेरी, ता.संमेश्वर, जि.रत्नागिरी सदस्य
  9 श्री. काझी इरशोद्दीन रशीदोद्दीन, बिलाल उर्दु प्राथमिक शाळा, हमालवाडी, स्टेशन रोड,परळी-वैजनाथ, जि.बीड सदस्य
  10 श्री. अस्लम तन्वीर कवी, पो.नसिराबाद, ता.व जि.जळगांव सदस्य
  11 श्री. शेख हनीफ शेख रशीद, सावदा, ता.रावेर, जि.जळगांव सदस्य
  12 श्री. अब्दुल मजीद अब्दुल हमीद शेख (छोटा मजीद शोला), देसाईगंज, वळसा, गडचिरोली सदस्य
  13 श्री. मसुद ऐजाज, खिलाफत हाऊस, जफरनगर, पांढरकवडा रोड, यवतमाळ सदस्य
  14 श्री. अझीम राही, साखरखेडा, बुलढाणा सदस्य
  15 श्री. फारुक सय्यद, ३२१/४४, मुस्लिम पच्छा पेठ, सोलापूर-५ सदस्य
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : उर्दु भाषेचे जतन, संवर्धन व प्रसार होण्याच्यादृष्टीने इतर भाषिकांसाठी उर्दु वर्ग सुरु करणे, इम्कान या त्रैमासिकाचे प्रकाशन, चर्चासत्रे, महफिले मुशायरा चे आयोजन करणे, उर्दु शाळा व महाविद्यालयांना वाड्मयीन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सहाय्यक अनुदान मंजूर करणे, उर्दु ग्रंथालये/वाचनालये स्थापन करणे, उर्दु ग्रंथालयांना मासिके व पुस्तकांच्या स्वरुपात सहाय्यक अनुदान मंजूर करणे, उर्दु पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन करणे, उर्दु नाट्य एकांकिका स्पर्धा/नाट्य कार्यशाळा आयोजन करणे/नाट्य एकांकिका लेखकास उत्तेजनपर पारितोषिके देणे, उर्दु हस्तलिखितांचे प्रकाशन व मराठी-उर्दु अनुवादकांना आर्थिक अनुदान देणे, उर्दु पुस्तांकांना पारितोषिके देणे, पदवी/पदव्युत्तर परिक्षेत उर्दु विषयात सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या विद्याथ्यांना पारितोषक देणे, आजारी अवस्थतेतील प्रसिध्द उर्दु लेखक, कवी ई. ना आर्थिक मदत करणे, विद्यापिठांना उर्दु विभाग सुरु करण्यासाठी अनुदान देणे, उर्दु पत्रकारांसाठी दर वर्षी कार्यशाळेचे आयोजन करणे, ई. स्वरुपाची कामे उर्दु साहित्य अकादमी मार्फत केली जातात. महाराष्ट्र राज्य उर्दु साहित्य अकादमी मार्फत देण्यात येणारे पुरस्कार : महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत दरवर्षी नामवंत कवी, लेखक, विचारवंत तसेच उर्दू भाषेच्या विकासासाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना अकादमीमार्फत पुरस्कार प्रदान करण्यात येतात. संत ज्ञानेश्वर राष्ट्रीय पुरस्कार हा अकादमी मार्फत देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार असून सन २०१२ वर्षाकरिता सदर पुरस्कार मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सुप्रसिध्द कवी गुलजार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. अकादमी मार्फत वितरीत करण्यात येत असलेल्या प्रस्तावांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे -
  अ . क्र . पुरस्काराची नावे रक्कम रुपये
  2 वली दक्कनी राष्ट्रीय पुरस्कार 30,000
  3 सिराज औरंगाबादी राज्य पुरस्कार 25,000
  4 सेतू माधवराव पगडी मराठी-उर्दू भाषांतर पुरस्कार 15,000
  5 उद्योन्मुख लेखकांना साहीर लुधियान्वी पुरस्कार 10,000
  6 पत्रकारिते करिता हारुन रशिद पुरस्कार (४ x १०,०००) 40,000
  7 विशेष पुरस्कार (१० x १०,०००) 1,00,000
  8 शिक्षक पुरस्कार (१० x १०,०००) 1,00,000
  9 पुस्तकांना पुरस्कार 1,50,000
  अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : अधिक्षक नि-कार्यकारी अधिकारी,महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी, मुंबई या पदावर सद्य:स्थिती श्री.एस.व्ही.एच. काद्री हे कार्यरत आहेत. त्यांचा कार्यालयीन पत्ता व दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहे. पत्ता : अधिक्षक नि कार्यकारी अधिकारी,महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी, 2रा मजला, डी.डी.बिल्डींग, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग,मुंबई-400 023. दुरध्वनी क्र. : 022- 22672703
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • उर्दु घर
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : उर्दु घर
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : महाराष्ट्रामध्ये उर्दू भाषेची वाड:मयीन प्रगती, मराठी व उर्दू भाषेमधील लेखक, कवी, विचारवंत इ. मध्ये सर्जनशील विचारांची देवाणघेवाण होऊन उर्दू भाषेचा वाड:मयीन विकास व्हावा व उर्दू भाषेच्या समृध्दीसाठी उर्दू घराच्या रुपाने एक ठिकाण असावे या उद्देशाने राज्यातील काही मुस्लीम बहुल शहरामध्ये उर्दू घर उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • राज्यातील उर्दु घरांच्या प्रस्तावांची सद्य:स्थिती खालीलप्रमाणे आहे-
 • १. नांदेड
 • जिल्हाधिकारी, नांदेड यांनी उर्दू घरासाठी मदिना तुल उलूम शाळेजवळील मदिनानगर येथील ७३९० चौ.मी. इतकी जागा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार नांदेड शहरातील मदिना नगर येथील मदिना तुल उलूम शाळे जवळील सर्वे नं.१२६९२ येथील महानगर पालिकेच्या मालकीच्या भूखंडावर उर्दू घर बांधण्याच्या रु.८,१६,००,०००/- (रुपये आठ कोटी सोळा लक्ष फक्त) इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली असून दि.१७/०२/२०१४ रोजी सदर उर्दू घराची पायाभरणी करण्यात आलेली आहे. या उद्दिष्टाकरिता सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात सदर प्रयोजनासाठी रु.७० लाखाची आर्थिक तरतूद करण्यात आली असून त्यापैकी रु.४९ लक्ष इतके अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे.
 • ३. सोलापूर
 • सोलापूर येथे उर्दू घर बांधण्याबाबत मा.मुख्यमंत्री महोदयांनी निदेश दिले होते. त्यानुसार, सोलापूर येथील सर्वे नं.६१७२ मधील सोलापूर महानगरपालिकेच्या ताब्यातील १७०१ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंडाचा ताबा शा.नि., म.व व.वि., क्र.जमीन ३७१३/पुबा १०९/प्र.क्र.सो-४२/ज-५, दि.२८/०२/२०१४ अन्वये उर्दु भवनाच्या निर्मितीसाठी अल्पसंख्यांक विकास विभागाला देण्याचे जिल्हाधिकारी, सोलापूर यांना निदेश देण्यात आले आहे.
 • वरील पार्श्वभुमीवर, सोलापूर शहरातील सर्वे नं.६१७२ मधील सोलापूर महानगरपालिकेच्या ताब्यातील १७०१ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंडावर उर्दू घर बांधण्याचा रु.४,९९,५५,६७८.००/- (रुपय चार कोटी नव्याण्णव लाख पंचावन्न हजार सहाशे अठ्ठयात्तर हजार फक्त) इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास शासन निर्णय, अल्पसंख्यांक विकास विभाग, क्रमांक : सोउघ २०१४/प्र.क्र.६०/कार्या-४, दि.२८ फेब्रुवारी, २०१४ अन्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली असून सदर उर्दुघराचा बांधकामाची पायाभरणी समारंभाद्वारे दि.०३/०३/२०१४ रोजी सुरुवात करण्यात आलेली आहे. या उद्दिष्टाकरिता सन 2015-16 या आर्थिक वर्षात रु.49.00 लक्ष इतके अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे. उर्वरित अनुदान वितरणाची कार्यवाही सुरु आहे.
 • 4. मालेगांव
 • मालेगाव शहरातील सर्वे नं.169 मधील उर्दू शाळा क्र.64 च्या जवळील 20,000 चौ.फु. क्षेत्रफळाच्या भूखंडावर उर्दू घर बांधण्याच्या रु.4,00,00,000/- (रुपये चार कोटी मात्र) इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास शासन निर्णय, अल्पसंख्यांक विकास विभाग, क्र.अविवि 2015/प्र.क्र.55/कार्या-4, दि.21 मे, 2015 अन्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
 • अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • हज हाउस
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : हज हाउस
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : राज्य शासनाने हज यात्रेस जाणाऱ्या यात्रेकरुंच्या सोयीसाठी राज्य पातळीवरील हज समिती स्थापन करण्याचा निर्णय दि. 29.12.1989 रोजी घेतला व त्यानुसार दि. 29.01.1990 रोजी राज्य हज समितीची स्थापना केली.तसेच समितीचे कार्य / कार्यक्षेत्रही निश्चित केले.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • 1.हज यात्रेकरुंच्या संख्येत प्रतिवर्षी होणारी वाढ विचारात घेऊन केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये हज यात्रेला जाण्यासाठी मुंबई, नागपूर व औरंगाबाद अशी तीन थेट उड्डान केंद्रे आहेत.
 • 2.केंद्र शासनाने हज समिती अधिनियम-2002 पारीत केला असुन यामध्ये राज्य हज समितीची स्थापणा, कार्यपध्दती, समितीची कार्ये, कार्यक्षेत्र, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या याबाबत सविस्तर तरतूदी नमूद करण्यात आल्या आहेत.
 • 3.राज्यातून हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंच्या संखेत दरवर्षी वाढ होत असून सन 2014-15 या हंगामात राज्यातील 6556 हज यात्रेकरु हजसाठी रवाना झाले.
 • 4.नागपूर येथे एकुण रु. 2,82,92,100 इतक्या खर्चाचे हज हाऊस सन 2013 साली उभारण्यात आले असून सन 2014-15 यावर्षी नागपूर येथुन1515 हज यात्रेकरु रवाना झाले.
 • 5.औरंगाबाद येथुन सन 2014-15 यावर्षी 4609 हज यात्रेकरु रवाना झाले. औरंगाबाद येथील हज हाऊसचे बांधकाम सुरु असून त्यासाठी रु. 29.88 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.
 • 6.हज यात्रेकरुंच्या सेवेसाठी त्यांच्या संखेच्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य हज समितीकडून खादिमुल हुज्जाज हज यात्रेस पाठविण्यात येतात. सन 2014-15 करिता 27 खादिमुल हुज्जाज पाठविण्यात आले होते. त्यासाठी रु. 45,27,000/- इतका खर्च राज्य शासनाने केला आहे.
 • अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • वक्फ न्यायाधिकरण
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : वक्फ न्यायाधिकरण
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : महाराष्ट्र वक्फ न्यायाधिकरणाची स्थापना महसूल व वन विभागाच्या दि.२० ऑक्टोबर, २००० च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. तसेच दि.12.12.2003 पासून महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, नागपूरची स्थापना केलेली आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने वक्फ अधिनियम,1995 मधील कलम 40 येथील तरतूदीनुसार दिलेल्या निर्णयाविरुध्द वक्फ न्यायाधिकरणत अपिल दाखल करण्याचा, वक्फ अधिनियम,1995 मधील कलम 83(2) येथील तरतुदींनुसार, संबंधित पक्षाला अधिकार आहेत.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद नांव : श्री.ए.ए.शाहपूरे पत्ता : पिठासीन अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद, 2 रा मजला, नवीन प्रशासकीय भवन जिल्हाधिकारी, कार्यालय, औरंगाबाद. दुरध्वनी क्र. : (0240) 2326558 ईमेल : pomhwtaurangabad@gmail.com महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, नागपूर पत्ता : पिठासीन अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, नागपूर (जिल्हा न्यायाधिश हेच पिठासीन अधिकारी असतात).
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
Total Number of Visitors
Total Number of Visitors