Government of Maharashtra

MAHA SCHEMES

logo

Shri Devendra Fadnavis Hon’ble Chief Minister

Public Health Department

 • महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद सेवा (MEMS) Maharashtra Emergency Medical Services
  योजनेचे नाव : महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद सेवा (MEMS) Maharashtra Emergency Medical Services
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
 • शासन निर्णय क्र.ईएमएस-२०११/प्र.क्र. २२४/आरोग्य-३ दि. २८ मार्च, २०१३
 • शासन निर्णय क्र.ईएमएस-२०११/प्र.क्र. २२४/आरोग्य-३ दि. २२ ऑक्टोंबर, २०१४
 • योजनेचा प्रकार : सर्वसाधरण (General)
  योजनेचा उद्देश :
 • अपघातानंतर अत्यावस्थ आपद्र्गस्तास पहिल्या तासात वैदयकीय मदत मिळाली तर आपद्ग्रस्ताचे प्राण वाचण्याची शक्यता अनेकपटींनी वाढते. वैद्यकीय परिभाषेमध्ये याला “सुवर्ण तास संकल्पना” Golden Hour असे संबोधले जाते ही संकल्पना राज्यात राबविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये (जसे अपघात, आग, पूर, अवघड, बाळंतपणे, सर्व गंभीर ह्दय रुग्ण, सर्पदंश, विषबाधा, श्वासोच्छवासाचे गंभीर आजार, मेंदुशी संबंधीत गंभीर आजार इ.) आपद्ग्रस्तास तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, याकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियानंतार्गत अत्याधुनिक दळणवळण यंत्रणेसह वैद्यकीय उपकरणांनी अतिसुसज्ज रुग्णवाहिकांची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात येते, जेणेकरुन आपद्ग्रस्तास रुग्णवाहिकेमध्ये प्राथमिक उपचार करुन तातडीने योग्य त्या रुग्णालयामध्ये पुढील उपचाराकरित पोहचविले जाते. सदर योजना केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि राज्य योजना यांच्या संयुक्त निधीतून मे. भारत विकास ग्रुप इंडीया लि. (बीव्हीजी) या खाजगी संस्थेच्य सहयोगाने राज्यात राबविली जात आहे. “आपद्ग्रस्तास पहिल्यासुवर्ण तासामध्ये वैद्यकीय उपचार उपलब्ध करणे. कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत संपूर्ण राज्यात रुग्णालय पुर्व २४ X 7 आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे. आपत्कानील वैद्यकीय सेवेचा दर्जा विश्वास व व्यापकता वाढविण्यासाठी आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद सेवा वाढविणे व संचालित करणे. आपत्कानील स्थितीत होणाऱ्य मृत्यूचे प्रमाण २० टक्क्यांपर्यत खाली आणणे असा या योजनोचा उद्देश आहे.”
 • योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्वसाधरण (General)
  योजनेच्या प्रमुख अटी : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये रुग्ण संदर्भित करण्यात येतो.
  आवश्यक कागदपत्रे : १०८ टोल फ्री क्रमांकावर फोन करणे.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहीकेमध्ये प्राथमिक उपचार करुन जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णास संदर्भित करण्यात येते.
  अर्ज करण्याची पद्धत : १०८ टोल फ्री क्रमांकावर फोन करणे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्धा ते १ तास
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
 • आयुक्त तथा संचालक,
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान,
 • ३ रा मजला, आरोग्य भवन, सेंट जॉर्ज रुग्णालय आवार, पी.डिमेलो रोड, मुंबई 400 001 दुरध्वनी क्र. 22717500 ईमेल आयडी mdnrhm.mumbai@gmail.com
 • १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: Online अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
 • राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना
  योजनेचे नाव : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र. रांगायो-2010/प्र.क्र.240/आ-6 दि. 31 मे, 2011
  योजनेचा प्रकार : योजनांतर्गत योजना
  योजनेचा उद्देश : राज्यातील दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना आरोग्य सेवा उपलब्ध करणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
 • • दारिद्रय रेषेखालील पिवळे, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिकाधारक
 • • दारिद्रय रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक (रु.१ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेली) कुटुंबे (शासकीय, निमशासकीय कर्मचारी व आयकरदाते वगळून),
 • • औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपुर विभागातील वर्धा अशा एकुण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे.
 • योजनेच्या प्रमुख अटी : -----
  आवश्यक कागदपत्रे : लाभार्थ्यांची ओळख राज्य शासनाने निश्चित केल्यानुसार योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबास देण्यात येणारे आरोग्य ओळखपत्र किंवा राज्य शासन ‍निर्धारीत करील अशा इतर कोणत्याही पुराव्याच्या आधारे तसेच सदर ओळखपत्र मिळेपर्यंत योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबांकडे असलेली वैध शिधापत्रिका व केंद्र/राज्य शासनाने वितरीत केलेले कोणतेही एक ओळखपत्र (छायाचित्रासह) उदा. आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालक परवाना इ. आणि औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपुर विभागातील वर्धा अशा एकुण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयातील शेतकरी कुटुंबांसाठी त्यांच्याकडे असलेली शुभ्र शिधापत्रिका अथवा 7/12 उताऱ्याच्या आधारे योजनेंतर्गत उपचार अनुज्ञेय आहेत.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • • योजनेंतर्गत समाविष्ट उपचार पध्दतींवरील उपचारासाठी कुटुबांतील एक किंवा सर्व सदस्यांसाठी वार्षिक विमा संरक्षण रक्कम प्रतिवर्ष/प्रतिकुटुंब रु.1.50 लाख एवढी आहे.
 • • मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी सदर मर्यादा प्रति वर्ष/प्रति कुटुंब रु.2.50 लाख आहे.
 • अर्ज करण्याची पद्धत : योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयात आरोग्य मित्रामार्फत रुग्णास अर्ज करता येतो.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : रुग्ण भरती झाल्यापासुन तात्काळ किंवा त्या दिवशी 12 ते 24 तासात.
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
 • मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी, वरळी, मुंबई
 • पदनाम दुरध्वनी ई-मेल
  मुख्य कार्यकारी अधिकारी (022) 24912291 ceo@jeevandayee.gov.in
  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (022) 24999202 dyceo@jeevandayee.gov.in
  सहाय्यक संचालक 24999201 adhs@jeevandayee.gov.in
  वित्तीय सल्लागार 24999201 fin.adv@jeevandayee.gov.in
 • १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • www.jeevandayee.gov.in
 • टिप :- दि. 7 जुन, 2016 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार सदर योजना 1 ऑक्टोबर, 2016 रोजी संपुष्टात येऊन दि. 2 ऑक्टोबर, 2016 पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राज्यात राबविण्यात येणार आहे.त्याबाबतचा शासन निर्णय दि. 4 ऑगस्ट, 2016 रोजी निर्गमित करण्यात आला असून या नवीन योजनेबाबतची सविस्तर माहिती आपले सरकार या ई-पोर्टल वर उपलब्ध करण्याकरिता यथावकाश कळविण्यात येईल.
Total Number of Visitors
Total Number of Visitors