Government of Maharashtra

MAHA SCHEMES

logo

Shri Devendra Fadnavis Hon’ble Chief Minister

Higher and Technical Edgucation Department Schemes

 • सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शा.नि. क्र. शिष्यवृ-2008/(254/08)/ मशि-6 , दिनांक 22 जानेवारी, 2009.
  योजनेचा प्रकार : महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षण घेणाया विद्यार्थ्यांसाठी
  योजनेचा उद्देश : उच्च गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गासाठी ही योजना लागू आहे.
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1. इ. 12 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैंकी टॉप 20 पर्सेंटाईल विद्यार्थ्यांची नावे संबंधित संकेतस्थळावर प्रकाशित केली जातात.
 • 2. सदर योजनेसाठी नवीन मंजूरीस्तव अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे नाव सदर यादीमध्ये नमुद असणे आवश्यक आहे.
 • 3. अर्जदार विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 6.00 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
 • 4. विद्यार्थ्यांने पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.
 • 5. पदविका (Diploma), दुरस्थ अभ्यासक्रमांसाठी (Distance Education), प्रवेश घेतलेले विद्यार्थी सदर योजनेसाठी अपात्र आहेत.
 • आवश्यक कागदपत्रे :
 • 1. बारावी पास झाले असलेबाबतचे प्रमाणपत्र.
 • 2. शाळेत प्रवेश घेतले बाबतचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
 • 3. पालकाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
 • 4. महाविद्यालयास भरलेली फी प्रदान पावती / रिसीप्ट.
 • 5. बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
 • 6. आधार कार्ड छायांकित प्रत (असल्यास).
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • पदवी स्तर (3 वर्ष) साठी – प्रतिवर्ष 10,000/-
 • पदव्युत्तर पदवी (2 वर्ष) साठी – प्रतिवर्ष 20,000/-
 • सदर रक्कम ही मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांचेतर्फे विद्यार्थ्यांचे बँक खातेवर थेट (DBT) जमा करण्यात येते.
 • अर्ज करण्याची पद्धत :
   नवीन मंजूरीस्तव ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांस नवीन (Fresh) शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे असे विद्यार्थी पुढील वर्षाचे अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेनंतर नुतनीकरणाचा अर्ज सद्यस्थितीत ऑफलाईन पध्दतीने महाविद्यालयामार्फत संचालनालयास सादर करणे आवश्यक आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज भरण्याची प्रक्रिया साधारणपणे माहे ऑगस्ट मध्ये सुरु होते. सदर अर्जाची विविध स्तरांवरील छाननी होऊन शिष्यवृत्तीची रक्कम माहे मार्च मध्ये विद्यार्थ्यांना थेट त्यांचे खातेवर वितरीत होते. (कालावधी : ऑगस्ट ते मार्च – 8 ते 9 महिने)
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.scholarships.gov.in
 • केंद्रशासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : केंद्रशासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शा.नि. क्र. संकीर्ण 2007/(542/07)/तांशि-1 दिनांक 21.1.2008
  योजनेचा प्रकार : केंद्रशासनाकडून राज्यातील मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, पारशी व जैन या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन 2007-08 पासून राबविण्यात येते. सदर शिष्यवृत्ती 11 वी ते पी.एचडी., व्यावसायिक(डी.एड्, बी.एड्, एम.एड्, आय.टी.आय.) सर्व डिप्लोमा व अकरावी/बारावी स्तरावरील एम.सी.व्ही.सी.अभ्यासक्रम या अभ्यासक्रमांना देण्यात येते. (तंत्र शिक्षण विभागातील व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यादीतील अभ्यासक्रम सोडून)
  योजनेचा उद्देश : अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी (मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, पारशी व जैन)
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
 • 2. मागील वार्षिक परीक्षेत किमान 50 टक्के गुण घेवून उत्तीर्ण झालेला असावा.
 • 3. अर्जदार इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा / स्टायपेंड लाभार्थी नसावा.
 • 4. नुतनीकरणसाठी विद्यार्थ्याने पुढील वर्गात प्रवेश घेतलेला असावा.
 • 5. अर्जदाराच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न मर्यादा रू . 2.00 लाख इतकी आहे.
 • 6 .एका कुटूंबातील फक्त 2 अपत्यांनांच सदर योजनेचा लाभ घेता येईल.
 • 7. विद्यार्थ्याने कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये स्वत:चे खाते उघडणे आवश्यक आहे.
 • आवश्यक कागदपत्रे :
 • 1. विद्यार्थ्याचा फोटो
 • 2. मागिल वर्षाची गुणपत्रिकेची प्रत.
 • 3. पालकाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
 • 4. महाविद्यालयास चालु वर्षाची फी भरल्याची पावती / रिसीप्ट.
 • 5. बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
 • 6. विद्यार्थ्याचे अल्पसंख्यांक असल्याबाबतचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.
 • 7. महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
 • 8. आधार कार्ड छायांकित प्रत (असल्यास).
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • रु.2000/- ते 15000/-पर्यंत (अभ्यासक्रम निहाय)
 • सदर रक्कम ही अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांचेतर्फे विद्यार्थ्यांचे बँक खातेवर थेट (DBT) जमा करण्यात येते.
 • अर्ज करण्याची पद्धत :
   नवीन मंजूरीसाठी तसेच नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांस नवीन (Fresh) शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी पुढील वर्षाचे अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेनंतर नुतनीकरणाचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरणे आवश्यक आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज भरण्याची प्रक्रिया साधारणपणे माहे जुलै/ऑगस्ट मध्ये सुरु होते. सदर अर्जाची विविध स्तरांवरील छाननी होऊन शिष्यवृत्तीची रक्कम माहे मार्च/एप्रिल मध्ये विद्यार्थ्यांना थेट त्यांचे खातेवर वितरीत होते. (कालावधी : जुलै/ऑगस्ट ते मार्च/एप्रिल – 8 ते 9 महिने)
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.scholarships.gov.in
 • केंद्रशासन पुरस्कृत अपंग विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना.
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : केंद्रशासन पुरस्कृत अपंग विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना.
  योजने बद्दलचा शासन निर्णय : सदर योजनेबाबतचा राज्य शासनाचा शासन निर्णय निर्गमित झालेला नाही. शासनाच्या दिनांक 26 फेब्रुवारी 2016 च्या पत्रान्वये सदर ऑनलाईन शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी उच्च शिक्षण उपविभागासाठी संचालक,उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
  योजनेचा प्रकार : केंद्रशासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागामार्फत अपंग विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. सदर योजनेची ऑनलाईन पध्दतीने या संचालनालयामार्फत अंमलबजावणी मार्च 2016 मध्ये करण्यात आलेली आहे. सदर शिष्यवृत्ती 11, 12 वी, पदवी अभ्यासक्रम तसेच पदव्युत्तर डीग्री, डिप्लोमा व सर्टिफिकेट या अभ्यासक्रमासाठी देण्यात येते
  योजनेचा उद्देश : अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गांसाठी.
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1. अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.
 • 2. अपंगत्व टक्केवारी 40 टक्के व त्यापुढील असावी.
 • 2. मागील वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेला असावा.
 • 3. अर्जदार इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा / स्टायपेंड लाभार्थी नसावा.
 • 4. अर्जदाराच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न मर्यादा रू . 2.50 लाख इतकी आहे.
 • 5 .एका कुटूंबातील फक्त 2 अपंग अपत्यांनांच सदर योजनेचा लाभ घेता येईल.
 • 6. विद्यार्थ्याने कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये स्वत:चे खाते उघडणे आवश्यक आहे.
 • आवश्यक कागदपत्रे :
 • 1. विद्यार्थ्याचा फोटो
 • 2. मागिल वर्षाची गुणपत्रिकेची प्रत.
 • 3. पालकाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
 • 4. महाविद्यालयास चालु वर्षाची फी भरल्याची पावती / रिसीप्ट.
 • 5. बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
 • 6. विद्यार्थ्याचे अपंग असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
 • 7. महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
 • 8. आधार कार्ड छायांकित प्रत (असल्यास).
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : सदर रक्कम ही विकलांगजन सशक्तीकरण विभाग नवी दिल्ली यांचमार्फत विद्यार्थ्यांचे बँक खातेवर थेट जमा करण्यात येते.श्अद्यापपर्यंत शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांची यादी या संचालनालयास प्राप्त झालेली नाही. या संचालनालयाकडून या योजनेची कार्यवाही सन 2015-16 मध्ये पहिल्यांदाच करण्यात आलेली आहे.
  अर्ज करण्याची पद्धत :
   नवीन मंजूरीसाठी तसेच नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांस नवीन (Fresh) शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी पुढील वर्षाचे अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेनंतर नुतनीकरणाचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरणे आवश्यक आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज भरण्याची प्रक्रिया साधारणपणे माहे जुलै/ऑगस्ट मध्ये सुरु होते. सदर अर्जाची विविध स्तरांवरील छाननी होऊन शिष्यवृत्तीची रक्कम माहे मार्च/एप्रिल मध्ये विद्यार्थ्यांना थेट त्यांचे खातेवर वितरीत होते. (कालावधी : जुलै/ऑगस्ट ते मार्च/एप्रिल – 8 ते 9 महिने)
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.scholarships.gov.in
 • अहिंदी भाषीक राज्यातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी हिंदी शिष्यवृत्ती.
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : अहिंदी भाषीक राज्यातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी हिंदी शिष्यवृत्ती.
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय सन 1984-85 अन्वये. अहिंदी राज्यातील विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेनंतर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने सन 1984-85 या शैक्षणिक वर्षापासून सदरची शिष्यवृत्ती सुरु केलेली आहे .
  योजनेचा प्रकार : अहिंदी राज्यातील विद्यार्थ्याना हिंदी भाषेचे ज्ञान व्हावे या हेतुने या शिष्यवृत्तीचे प्रयोजन शिष्यवृत्ती मंजूर करण्यामागे प्रस्तुत केलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा हिंदी नाही अशा राज्यांमधील विद्यार्थ्यंाना शिष्यवृत्ती मंजुर केली जाते.
  योजनेचा उद्देश : अहिंदी राज्यातील विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेनंतर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : शासनाने एकुण 255 संच निर्धीरीत सर्व अहिंदी भाषीक विद्यार्थ्यांनासाठी केले आहे.
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1. या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची मर्यादा नाही.
 • 2. मागील वार्षिक परीक्षेत किमान 60 टक्के गुण आवश्यक आहेत.
 • 3.विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • आवश्यक कागदपत्रे :
 • 1. माध्यमीक शालांत परीक्षा व उच्च माध्यमीक परीक्षा उत्तीर्ण असलेबाबतचे प्रमाणपत्र.
 • 2. बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
 • 3. नुतनीकरणासाठी मागील वर्षाची पास झालेची गुणपत्रीका.
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : 11 वी 12 प्रतिवर्ष -3000/- पदवीसाठी- प्रतिवर्ष 5000/- पदव्युत्तरस्तरसाठी – प्रतिवर्ष 10000/- सदर रक्कम ही भारतीय स्टेट बँक ॲाफ ईडिया पुणे कोषागार शाखा,पुणे यांचामार्फत विद्यार्थ्यांचे बँक खातेवर थेट (NFT) जमा करण्यात येते.श्
  अर्ज करण्याची पद्धत :
   नवीनमंजूरी/नुतनिकरणसाठी ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात येतात. ज्या विद्यार्थ्यांस नवीन (Fresh) शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षाचे अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेनंतर नुतनीकरणाचा अर्ज करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयामार्फत संचालनालयास सादर करणे आवश्यक आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : श्विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयामार्फत संचालनालयास माहे सप्टेंबर पर्यंत येने आवश्क आहे. सदर अर्जाची छाननी होऊन शिष्यवृत्तीची रक्कम माहे एप्रिल मध्ये विद्यार्थ्यांना थेट त्यांचे खातेवर वितरीत होते. (कालावधी : जुन ते एप्रिल – 9 ते 10 महिने)
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: ऑफलाईन पध्दतीने.
 • राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना (वरिष्ठ महाविद्यालयीन)
 • शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती योजना
 • अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना (वरिष्ठ महाविद्यालयीन)
  योजने बद्दलचा शासन निर्णय : क्रीडा व समाजकल्याण विभाग, शा.नि. क्र. एससीएच-1063-यु, दिनांक 4 जुन, 1964 व दि. 16 नोव्हेंबर, 1964.
  योजनेचा प्रकार : सदर योजनेसाठी राज्याकरिता एकूण 1208 संच मंजूर आहेत. यापैकी 230 संच वाणिज्य शाखेसाठी व 55 संच विधी शाखेसाठी राज्यस्तरावर मंजूर असून उर्वरीत 923 संचापैकी 638 विज्ञान शाखेसाठी आणि 285 कला शाखेसाठी मंजूर आहेत. कला व विज्ञान शाखेच्या संचाची विभागणी (विभागनिहाय) विभागीय मंडळामधुन इ. 12 वीसाठी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात येते.
  योजनेचा उद्देश : राज्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास उत्तेजन मिळावे म्हणून सदर शिष्यवृत्ती दिली जाते.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गासाठी ही योजना लागू आहे.
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1. कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांसाठीच प्रवेश घेतेलेले विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करण्यास्तव पात्र आहेत.
 • 2. नवीन मंजूरीस्तव अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांस इ. 12 वीच्या परीक्षेत किमान 60 टक्के गुण प्राप्त असणे आवश्यक आहे.
 • 3. विद्यार्थ्यांचा अर्ज संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांना संबंधित महाविद्यालयामार्फत 30 सप्टेंबर पूर्वी पोहोचणे आवश्यक आहे.
 • आवश्यक कागदपत्रे :
 • 1. बारावीची परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्राची छायांकित प्रत.
 • 2. बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : नवीन मंजूरीस्तव अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांस शा.नि.05.02.2004 प्रमाणे प्रति माह 100 प्रमाणे रक्कम रु. 1000/- तथापि, नुतनीकरणासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रति माह 100 प्रमाणे रक्कम रु. 1200/- (योजनेच्या नवीन मंजूरीची कार्यवाही उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांचेतर्फे करण्यात येते व नुतनीकरण महाविद्यालयाशी संबंधित विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांचेमार्फत करण्यात येते.)
  अर्ज करण्याची पद्धत : उच्च शिक्षण संचालनालयामार्फत त्यांचे अधिनस्त सर्व महाविद्यालयास/अकृषि विद्यापीठांस माहे जुलै मध्ये परिपत्रकाद्वारे सदर योजनेचा माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया/अर्जाचा नमुना पाठविण्यात येतो. विद्यार्थ्यांनी त्यांचा अर्ज ऑफलाईन पध्दतीने आवश्यक सहपत्रांसह महाविद्यालयामार्फत उच्च शिक्षण संचालनालयास 30 सप्टेंबर पुर्वी सादर करणे आवश्यक आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज भरण्याची प्रक्रिया साधारणपणे माहे जुलै मध्ये सुरु होते. सदर अर्जाची विविध स्तरांवरील छाननी होऊन शिष्यवृत्तीची रक्कम माहे फेब्रुवारी - मार्च मध्ये विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांचेद्वारे महाविद्यालयास/विद्यार्थ्यांस वितरीत होते. (कालावधी : ऑगस्ट ते मार्च – 8 ते 9 महिने)
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सदर योजना ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येते.
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय : क्रीडा व समाजकल्याण विभाग, शा.नि. क्र. एससीएच/1470/107572-एस, दिनांक 14 मे, 1971.
  योजनेचा प्रकार : सदर योजनेसाठी शासकीय विद्यानिकेतन पुसेगांव, अमरावती, औरंगाबाद व धुळे यांचेकरिता प्रत्येकी 20 प्रमाणे एकूण एकूण 80 संच मंजूर आहे.
  योजनेचा उद्देश : राज्यातील शासकीय विद्यानिकेतनमधून शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दिली जाते.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गासाठी ही योजना लागू आहे.
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1. शासकीय विद्यानिकेतन पुसेगांव, अमरावती, औरंगाबाद व धुळे यांचेमधून शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
 • 2. नवीन मंजूरीस्तव अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांस शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (10 वी) किमान 60 टक्के गुण प्राप्त असणे आवश्यक आहे.
 • 3. विद्यार्थ्याने सदर योजनेचा अर्ज त्याने ज्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे, त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यामार्फत संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांना 30 सप्टेंबर पूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
 • आवश्यक कागदपत्रे :
 • 1. शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण प्रमाणपत्राची छायांकित प्रत.
 • 2. बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
 • 3. शासकीय विद्यानिकेतद्वारे प्राप्त इन्टायटलमेंट कार्ड.
 • 4. कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतलेबाबतचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : नवीन मंजूरीस्तव अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांस शा.नि.05.02.2004 प्रमाणे प्रति माह 100 प्रमाणे रक्कम रु. 1000/- तथापि, नुतनीकरणासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रति माह 100 प्रमाणे रक्कम रु. 1200/- (योजनेच्या नवीन मंजूरीची कार्यवाही उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांचेतर्फे करण्यात येते व नुतनीकरण महाविद्यालयाशी संबंधित विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांचेमार्फत करण्यात येते.)
  अर्ज करण्याची पद्धत : उच्च शिक्षण संचालनालयामार्फत त्यांचे अधिनस्त सर्व महाविद्यालयास माहे जुलै मध्ये परिपत्रकाद्वारे सदर योजनेचा माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया/अर्जाचा नमुना पाठविण्यात येतो. विद्यार्थ्यांनी त्यांचा अर्ज ऑफलाईन पध्दतीने आवश्यक सहपत्रांसह विद्यापीठांमार्फत उच्च शिक्षण संचालनालयास 30 सप्टेंबर पुर्वी सादर करणे आवश्यक आहे. (विद्यार्थ्यांना सदर योजनेची माहिती व योजनेचा अर्ज संबंधित विद्यानिकेतनद्वारे देखील उपलब्ध करुन देण्यात येतो.)
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज भरण्याची प्रक्रिया साधारणपणे माहे जुलै मध्ये सुरु होते. सदर अर्जाची विविध स्तरांवरील छाननी होऊन शिष्यवृत्तीची रक्कम माहे फेब्रुवारी - मार्च मध्ये विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांचेद्वारे महाविद्यालयास/विद्यार्थ्यांस वितरीत होते. (कालावधी : ऑगस्ट ते मार्च – 8 ते 9 महिने)
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सदर योजना ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येते.
 • एकलव्य आर्थिक सहाय्य योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : एकलव्य आर्थिक सहाय्य योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय एससीएच-1095/31/96/मशि-4, दि.24.01.1996 अन्वये राज्य शासनाने सन 1995-96 या शैक्षणिक वर्षापासून सुरु कण्यात आलेली आहे.
  योजनेचा प्रकार : राज्य शासनकडून ऑफलाईन पध्दतीने सन 1995-96 या शैक्षणिक वर्षापासून एकलव्य आर्थिक सहाय्य योजना सुरु केली आहे, होतकरु व गरीब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी शासनाने ही योजना सुरु केलेली आहे.
  योजनेचा उद्देश : होतकरु व गरीब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी सुरु केली आहे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गासाठी ही योजना लागू आहे.
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1) विधी, वाणिज्य व कला शाखेमध्ये किमान 60 टक्के व विज्ञान शाखेकरिता किमान 70 टक्के पदवी अभ्यासक्रमामध्ये गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
 • 2) लाभार्थ्यांचे पालकांचे वार्षिक उत्पन्न रु . 75,000/- पेक्षा कमी असावे.
 • 3) सदर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • 4)संबंधित लाभार्थी कुठेही पूर्ण किंवा अर्धवेळ नोकरी करणारा नसावा.
 • आवश्यक कागदपत्रे :
 • 1. पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेबाबतचे प्रमाणपत्र.
 • 2. पालकाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
 • 3. बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : पदव्युत्तरस्तर (2 वर्ष) साठी – प्रतिवर्ष 5000/- सदर रक्कम ही भारतीय स्टेट बँक ॲाफ ईडिया पुणे कोषागार शाखा,पुणे यांचामार्फत विद्यार्थ्यांचे बँक खातेवर थेट (NFT) जमा करण्यात येते.
  अर्ज करण्याची पद्धत : नवीनमंजूरी/नुतनिकरणसाठी ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात येतात. ज्या विद्यार्थ्यांस नवीन (Fresh) शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षाचे अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेनंतर नुतनीकरणाचा अर्ज करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयामार्फत संचालनालयास सादर करणे आवश्यक आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयामार्फत संचालनालयास माहे सप्टेंबर पर्यंत येने आवश्क आहे. सदर अर्जाची छाननी होऊन शिष्यवृत्तीची रक्कम माहे एप्रिल मध्ये विद्यार्थ्यांना थेट त्यांचे खातेवर वितरीत होते.
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सदर योजना ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येते.
 • गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य.
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य.
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय शिक्षण व सेवायोजन विभाग, एएफईडी 1083/181635(2317) साशि-5 दि. 17.05.1984 नूसार गुणवान विद्यार्थ्यांकरिता आर्थिक सहाय्य देण्याची योजना सन 1984-85 च्या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित करण्यात आली आहे..
  योजनेचा प्रकार : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाच्या पुणे,मुंबई,लातूर,औरंगाबाद,नाशिक,कोल्हापूर,अमरावती व नागपूर परीक्षा याविभागाती परीक्षेत वरचा क्रमांक मिळविणाऱ्या गुणवान विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेस आर्थिक अडचनीमुळे बाधा पोहचू नये या उददेशाने आशा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणसाठी आर्थिक साहय्य देण्यात येते.
  योजनेचा उद्देश : माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा यामध्ये वरचा क्रमांक मिळविणाऱ्या गुणवान विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण पुर्ण करण्यासाठी.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व संवर्गातील गुणवान विद्यार्थ्यांनासाठी.
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1) दरवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षांमध्ये वरचा क्रमांक मिळवणे आवश्यक.
 • 2. नूतनीकरणासाठी विद्याथ्यांने कनिष्ठ स्तरावर किमान 55 टक्के व वरिष्ठ स्तरावर किमान 65 टक्के गुण घेऊन पुढील वर्गात प्रवेश घेतला पाहिजे
 • 3.विद्यार्थ्यांने जो अभ्यासक्रम घेतला असेल, तो त्याने किमाण त्या अभ्यासक्रमाच्या पदवी/पदवीका पर्यंत पुर्ण केला पाहिजे.
 • 4.एखादा निवडलेला अभ्यासक्रम बदल करावयाचा असल्यास त्यासाठी विद्यार्थ्यांने शिक्षण संचालकाची पुर्व-संमती घेणे आवश्यक आहे.
 • 5.विविध शुल्काची (फीची) प्रतिपुर्ती शासनाने किंवा संबंधीत विद्यापीठाने मान्य केलेल्या दरानुसार केली जाईल.
 • 6.या योजनेचा लाभ घेत असतांना विद्यार्थ्यांला केंद्र अथवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा अथवा सवलतीचा लाभ घेता येणार नाही.
 • आवश्यक कागदपत्रे :
 • 1. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षांमध्ये विद्याथ्यांने कनिष्ठ स्तरावर किमान 55 टक्के व वरिष्ठ स्तरावर किमान 65 टक्के असलेबाबतचे गुणपत्रीका.
 • 2. बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
 • 3. मागील वर्षाची गुण पत्रीका.
 • 4. विद्यार्थ्यांने महाविद्यालयात फी भारलेल्याची पावती.
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : 11 वी 12 प्रतिवर्ष -1600 ते 1800/- पदवीसाठी (कला, वाणिज्य, विज्ञान)- प्रतिवर्ष 3100/- इंजीनेअरीगं – प्रतिवर्ष 14500/- मेडीकल प्रतिवर्ष- 15400/- सदर रक्कम ही भारतीय स्टेट बँक ॲाफ ईडिया पुणे कोषागार शाखा,पुणे यांचामार्फत विद्यार्थ्यांचे बँक खातेवर थेट (NFT) जमा करण्यात येते.
  अर्ज करण्याची पद्धत : सदर योजनेसाठी इयत्ता 10 वी व 12 वी च्या निकालानंतर विभागीय शिक्षण मंडळ पुणे, यांच्या कडून प्राप्त झालेल्या यादी नुसार पात्र विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती सवलतीचे अर्ज पाठविण्यात येतात.सदर अर्ज विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयामार्फत प्राप्त झाल्या नंतर शिष्यवृत्ती मंजुरीचे आदेश काडण्यात येतात.नुतनीकरणासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्याल्यामार्फत अर्ज करणे आवश्यक आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयामार्फत संचालनालयास माहे सप्टेंबर पर्यंत येने आवश्क आहे. सदर अर्जाची छाननी होऊन शिष्यवृत्तीची रक्कम माहे एप्रिल मध्ये विद्यार्थ्यांना थेट त्यांचे खातेवर वितरीत होते. (कालावधी : जुलै ते एप्रिल – 9 ते 10 महिने)
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सदर योजना ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येते.
 • राज्य शासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : राज्य शासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती
  योजने बद्दलचा शासन निर्णय : क्रीडा व सेवायोजन विभाग, शा.नि. क्र. एससीएच-1065-यु, दिनांक 19 सप्टेंबर, 1965.
  योजनेचा प्रकार : शासकीय विज्ञान संस्था / महाविद्यालय तसेच विद्यापीठांकडून प्राप्त झालेल्या आवेदन पत्रानुसार विहित केलेल्या मंजूर संचाच्या (एकूण मंजूर संच – 76) प्रमाणात शिष्यवृत्ती मंजूर केली जाते.
  योजनेचा उद्देश : राज्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेण्यास उत्तेजन मिळावे म्हणून सदर शिष्यवृत्ती दिली जाते.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गासाठी ही योजना लागू आहे.
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1. पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतेलेले विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करण्यास्तव पात्र आहेत.
 • 2. विद्यार्थ्यांचा अर्ज संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांना संबंधित महाविद्यालयामार्फत 30 सप्टेंबर पूर्वी पोहोचणे आवश्यक आहे.
 • 3. विद्यार्थ्यांचे अभ्यासातील समाधानकारक प्रगती अहवालानुसार दुसऱ्या वर्षाचे नुतनीकरण मंजूर केले जाते.
 • आवश्यक कागदपत्रे :
 • 1. पदवी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्राची छायांकित प्रत.
 • 2. बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
 • 3. महाविद्यालयात प्रवेश घेतलेबाबतचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : नवीन मंजूरीस्तव अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांस शा.नि.05.02.2004 प्रमाणे प्रति माह 100 प्रमाणे रक्कम रु. 1000/- तथापि, नुतनीकरणासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रति माह 100 प्रमाणे रक्कम रु. 1200/-
  अर्ज करण्याची पद्धत : उच्च शिक्षण संचालनालयामार्फत त्यांचे अधिनस्त संबंधित महाविद्यालयास/अकृषि विद्यापीठांस माहे जुलै मध्ये परिपत्रकाद्वारे सदर योजनेचा माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया/अर्जाचा नमुना पाठविण्यात येतो. विद्यार्थ्यांनी त्यांचा अर्ज ऑफलाईन पध्दतीने आवश्यक सहपत्रांसह महाविद्यालयामार्फत / विद्यापीठांमार्फत उच्च शिक्षण संचालनालयास 30 सप्टेंबर पुर्वी सादर करणे आवश्यक आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज भरण्याची प्रक्रिया साधारणपणे माहे जुलै मध्ये सुरु होते. सदर अर्जाची विविध स्तरांवरील छाननी होऊन शिष्यवृत्तीची रक्कम माहे फेब्रुवारी - मार्च मध्ये विभागीय संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांचेद्वारे महाविद्यालयास/विद्यार्थ्यांस वितरीत होते. (कालावधी : ऑगस्ट ते मार्च – 8 ते 9 महिने)
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सदर योजना ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येते.
 • शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय एससीएच/1082/4199 विशि-3, दि. 13/08/1985 अन्वये सुरु करण्यात आलेली आहे.
  योजनेचा प्रकार : राज्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन स्तरावीरल विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयामध्ये पी. एच्. डी. करता यावी, या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.
  योजनेचा उद्देश : राज्यातील विद्यार्थ्यांना पी. एच्. डी. पुर्ण करता यावी.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी.
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1.श्शिक्षण संचालकांच्या स्तरावर गठित केलेल्या समितीमार्फत प्राप्त आवेदनपत्रांची छाननी करू न गुणवत्तेनुसार विहित तीन संचांची निवड केली जाते.
 • 2. महाविद्यालयीन स्तरावर प्राचार्यांनी गठित केलेल्या समितीमार्फत पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रम व इतर संशोधनपर रेकॉर्ड पाहून त्यांना विहित केलेल्या संचास अधिन राहून प्राचार्यांकडून निवड केली जाते.
 • 3. या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा नाही.
 • 4.संबंधित छात्र कोठेही सेवेत नसावा. तसेच त्यांनी इतर कोणतीही शिष्यवृत्ती घेतलेली नसावी.
 • 5. संबंधित विद्यार्थ्याने पी. एच्. डी. संबंधी विद्यापीठामध्ये रीतसर नोंदणी करू न संबंधित मार्गदर्शकाने शिफारस करणे आवश्यक आहे.
 • 6. महाविद्यालयीन स्तरांवर पदव्युत्तर अभ्यासक्रम व इतर संशोधनपर रेकॉर्ड पाहून विहीत केलेल्या संचाच्या अधीन राहून प्राचार्यांमार्फत निवड केली जाते.
 • 7.विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • 8.सदर शिष्यवृत्ती चे राज्य स्तर 3 व महाविद्यालयीन 11 संच आहेत.
 • आवश्यक कागदपत्रे :
 • 1. विहित नमुन्यातील आवश्यकती कागदपत्रे
 • 2. बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
 • 3. अधिछात्राची त्याच्या मार्गदर्शकामार्फत त्याचा वार्षीक प्रगती अहवाल सादर करणे आवश्यक.
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : पी. एच्. डी प्रतिवर्ष- 9000/- व रु 1000 सादीलवार खर्च रक्कम ही भारतीय स्टेट बँक ॲाफ ईडिया पुणे कोषागार शाखा,पुणे यांचामार्फत विद्यार्थ्यांचे बँक खातेवर थेट (NFT) जमा करण्यात येते.श्
  अर्ज करण्याची पद्धत : नवीनमंजूरी/नुतनिकरणसाठी ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांस नवीन (Fresh) शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे असे विद्यार्थी पुढील वर्षाचे अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेनंतर नुतनीकरणाचा अर्ज सद्यस्थितीत ऑफलाईन पध्दतीने महाविद्यालयामार्फत संचालनालयास सादर करणे आवश्यक आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया साधारणपणे माहे ऑगस्ट ते मार्च पर्यंत असतेे. सदर अर्जाची विविध स्तरांवरील छाननी होऊन शिष्यवृत्तीची रक्कम माहे एप्रिल मध्ये विद्यार्थ्यांना थेट त्यांचे खातेवर वितरीत होते. (कालावधी : ऑगस्ट ते मार्च – 8 ते 10 महिने)
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सदर योजना ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येते.
 • जवाहरलाल नेहरु विद्यापीठ शिष्यवृत्ती
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : जवाहरलाल नेहरु विद्यापीठ शिष्यवृत्ती
  योजने बद्दलचा शासन निर्णय : एससीएच/1082/151160/2173/जनरल-5, दि. 07/05/1983 अन्वये महाराष्ट्र राज्यासाठी एक संच निर्धारित केला आहे.
  योजनेचा प्रकार : जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने नवी दिल्ली त्यांचेकडून विहित नियमानुसार निवड करुन त्या विद्यापीठात शिकत असलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांमधून एका विद्यार्थ्याची निवड केली जाते. जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने निवड केल्यानुसार विद्यार्थ्यांचा स्वयंपुर्ण प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर करू न त्यास शासनाची मंजूरी मिळाल्यानंतर नवीन मंजूरीनंतर तीन वर्ष जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने (नवी दिल्ली) पाठविलेल्या प्रगती अहवालानुसार नुतनीकरण मंजूर केले जाते.
  योजनेचा उद्देश : जवाहरलाल नेहरु विद्यापीठात शिकत असलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना शिक्षण पुर्ण करता यावे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व संवर्गातील गुणवान विद्यार्थ्यांसाठी.
  योजनेच्या प्रमुख अटी : 1.विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  आवश्यक कागदपत्रे : 1.जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने त्यांचेकडून विहित नियमानुसार.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : द. मा. रु.8000/- व रु.10000 सादीलवार खर्च.
  अर्ज करण्याची पद्धत : जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने त्यांचेकडील विहित नियमानुसार निवड झाल्यानंतर विद्यापीठ स्तरांवरुन संचालनालयास कळविण्यात येते.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया साधारणपणे माहे ऑगस्ट ते मार्च पर्यंत असतेे. सदर अर्जाची विविध स्तरांवरील छाननी होऊन शिष्यवृत्तीची रक्कम माहे एप्रिल मध्ये विद्यार्थ्यांना थेट त्यांचे खातेवर वितरीत होते. (कालावधी : ऑगस्ट ते मार्च – 8 ते 10 महिने)
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत निवड होणाऱ्या अखिल भारतीय प्रशासकीय सेवामध्ये महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढावे यासाठी गुणवत्ताधारक विशेष शिष्यवृत्ती योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत निवड होणाऱ्या अखिल भारतीय प्रशासकीय सेवामध्ये महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढावे यासाठी गुणवत्ताधारक विशेष शिष्यवृत्ती योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय : प्रीआय-5415/ प्र.क्र 192/ मशि-2 दिनांक 16.04.2016
  योजनेचा प्रकार : केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परिक्षा उत्तिर्ण झालेल्या उमेवारांना मुलाखतीसाठी प्रशिक्षणासाठी अर्थसाहय्य देणे बाबत.
  योजनेचा उद्देश : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत निवड होणाऱ्या अखिल भारतीय प्रशासकीय सेवामध्ये महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढावे यासाठी गुणवत्ताधारक विशेष शिष्यवृत्ती व प्रशिक्षणासाठी अर्थसाय्य देणे
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परिक्षा उत्तिर्ण होणारे सर्व प्रर्वगातील उमेदवार
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1. सदर शिष्यवृत्तीकरीता दिल्ली स्थीत नामाकिंत खाजगी प्रशिक्षण संस्थापैकी शासनाने निवड केलेल्या तीन संस्थापैकी एका संस्थेमध्ये प्रवेश घेण्याची मुभा पात्र उमेदवाराला देण्यात येईल.
 • 2. शिष्यवृत्तीसाठी पात्र उमेदवारास प्रशिक्षण घेतल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची संबंधित परिक्षा देणे बंधनकारक असेल अन्यथा त्या शिष्यवृत्तीची संपुर्ण रक्कम एकरकमी शासनास परत करण्यात येईल. अशा आसयाचे बंधपत्र देण आवश्यक राहील.
 • 3. सदरहु उमेदवारांनी संचालक, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई यांच्याशी संपर्कात राहुन मासिक अहवाल सादर करणे बंधनकारक राहील.
 • आवश्यक कागदपत्रे :
 • 1. रहिवासी प्रमाणपत्र
 • 2. उत्पनाचा दाखला
 • 3. पदवी परिक्षा प्रमाणपत्र
 • 4. त्या वर्षीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची गुनपत्रिका
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : सदर शिष्यवृत्तीचालाभ प्रत्येक उमदेवारांना दिल्ली येथील त्याच्या प्रशिक्षण कालावधीसाठी रुपये 10,000/- प्रतिमहा निर्वाह भत्ता देण्यात येईल.
  अर्ज करण्याची पद्धत : ऑफ लाईन पध्दतीने
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 60 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संचालक, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, हजारी मल सोमाणी मार्ग, मुंबई
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • राज्य शासनाची इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या (कला,वाणिज्य, विज्ञान पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम) राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : राज्य शासनाची इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या (कला,वाणिज्य, विज्ञान पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम) राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय : अल्पसंख्यांक विकास विभाग,अविवि-2011/प्र.क्र.44/11/का.6 दि.14-ऑक्टेाबंर 2011.
  योजनेचा प्रकार :
 • राज्य शासनाने अल्पसंख्यांक लोकसमुह म्हणुन घेाषीत केलेल्या राज्यातील मुस्लीम,बौध्द,ख्रिश्चन,जैन,शीख व पारशी या सामाजातील तंात्रिक व व्यवसायीक तसेच इयत्ता बारावी नंतरच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या (कला,वाणिज्य, विज्ञान पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम) राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती योजना
 • सदर योजनेचे नोडल ऑफीसर संचालक तंत्रशिक्षण हे आहेत. या संचालनालयाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अर्जानूसार विद्यार्थ्यांची यादी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठविण्यात येते. सदर शिष्यवृत्तीची रक्कम तंत्रशिक्षण संचालनालयाकडून विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते.
 • योजनेचा उद्देश : अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी (मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, पारशी व जैन)
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1. इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त अभ्यासक्रमांमध्ये (कला ,वाणिज्य, विज्ञान) प्रथम वर्ष ते अंतिमवर्षात शिकत असलेल्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना लागू आहे.
 • 2. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असावा व त्याने उच्च माध्यमीक शालांत परीक्षा महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण केलेली असावी.
 • 3. अर्जदार हा इतर कोणत्याही शिष्यवृत्ती/स्टायपेंडचा लाभार्थी नसावा.
 • 4. पालकाचे वार्षिक उत्पन्न हे 6.00 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी असावे.
 • 5. नुतनिकरणासाठी विद्यार्थ्यांने पुढील वर्षात प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.
 • आवश्यक कागदपत्रे :
 • विद्यार्थ्याचा फोटो
 • माध्यमिक व उच्च माघ्यमीक शालंात प्रमाणपत्र परीक्षा व त्यापुढील परीक्षांमधील गुणपत्रीकेच्या प्रती.
 • पालकाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
 • महाविद्यालयास चालु वर्षाची फी भरल्याची पावती / रिसीप्ट.
 • बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
 • विद्यार्थ्याचे अल्पसंख्यांक असल्याबाबतचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.
 • महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
 • आधार कार्ड छायांकित प्रत (असल्यास).
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : रु.5000/- पर्यंत (अभ्यासक्रम निहाय) सदर रक्कम ही तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई यांचेतर्फे विद्यार्थ्यांचे बँक खातेवर थेट (DBT) जमा करण्यात येते.श्
  अर्ज करण्याची पद्धत : नवीन मंजूरीसाठी तसेच नुतनीकरणासाठी ऑॅफलाईन पदधतीने अर्ज मागवीण्यात येतात. विद्यार्थ्यांनी अर्ज संबंधित महाविद्यालयाकडे दिल्यानंतर महाविद्यालयांनी अर्ज तपासून प्रमाणीत करुन सदर अर्ज विभागीय सहसंचालक कार्यालयांकडे जमा करण्यात येतात. सहसंचालक कार्यालयाकडून अर्जांची पडताळनी करुन विहित नमुन्यातील यादी या संचालनालयाकडे प्राप्त होते. सदर यादी मंजूरीसाठी या योजनेचे नोडल अधिकारी संचालक तंत्रशिक्षण यांचेकडे पाठविण्यात येते.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : (कालावधी : 7 ते 8 महिने).
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • राज्य शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : राज्य शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय : दि. 31 मार्च 2016
  योजनेचा प्रकार : राज्य योजना
  योजनेचा उद्देश : सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी लाभ देणे
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : या विभागाकडून तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील निवडक व्यावयायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणा-या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येतेा.
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1) विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न रु. 1 लाख पेक्षा कमी असणे
 • 2) व्यावसायिक अभ्यासक्रम केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणे(अभिमत विद्यापीठ वगळून)
 • 3) प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमासाठीची तंत्रशिक्षण मंडळ/विद्यापीठाकडून घेण्यात येणा-या परीक्षेस बसणे
 • आवश्यक कागदपत्रे :
 • 1) अल्प उत्पन्न गटाचे प्रमाणपत्र
 • 2) आधार क्रमांक
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : संबंधित शैक्षणिक संस्थेकडून आकारल्या जाणा-या शिक्षण शुल्काच्या 50% मर्यादेपर्यंतच्या शुल्काची प्रतिपूर्ती करणे
  अर्ज करण्याची पद्धत : याकरीता तंत्रशिक्षण संचालनालयाकडे Online स्वरुपात अर्ज करणे
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अंदाजे 1 वर्ष किंवा निधीच्या उपलब्धतेनुसार
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : तंत्रशिक्षण संचालनालय, महापालीका मार्ग, मुंबई 400 001 दुरध्वनी क्र. 2692102, 22690007
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.dte.org.in
Total Number of Visitors
Total Number of Visitors