Government of Maharashtra

MAHA SCHEMES

logo

Shri Devendra Fadnavis Hon’ble Chief Minister

Employment Guarantee Scheme (EGS)/NREGA Department

 • 1.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र (केंद्र पुरस्कृत)
  २. राज्य रोजगार हमी योजना (राज्य पुरस्कृत)
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव :
 • 1.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र (केंद्र पुरस्कृत)
 • २. राज्य रोजगार हमी योजना (राज्य पुरस्कृत)
 • योजने बद्दलचा शासन निर्णय : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम २००५ तसेच महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 (दि. 6 ऑगस्ट, 2014 पर्यंत सुधारित)
  योजनेचा प्रकार : केंद्र पुरस्कृत योजना/राज्य पुरस्कृत योजना.
  योजनेचा उद्देश : अकुशल काम करण्यास इच्छुक असणा-या प्रत्येक कुटुंबातील प्रौढ व्यक्तीला योजनेंतर्गत 100 दिवस प्रती कुटुंब रोजगाराची हमी देण्यात आली असून, त्या माध्यमातून स्थायी स्वरुपाची मालमत्ता निर्माण करणे हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
 • 1. ग्रामीण भागातील 18 वर्षावरील प्रौढ व्यक्तींना सदर योजना लागू.
 • 2. वैयक्तिक लाभाची कामे-
 • वैयक्तिक लाभाची कामे देताना पुढील प्रवर्गातील कुटुंबाच्या मत्तांबाबत कामांना प्राधान्य देण्यात येते.
 • १. अनुसूचित जाती
 • २. अनुसूचित जमाती
 • ३. भटक्या जमाती
 • ४. निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)
 • ५. दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे
 • ६. स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे
 • ७. शारिरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
 • ८. जमीन सुधारणांचे लाभार्थी
 • ९. इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
 • १०. अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वनवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम, 2006 (2007 चा 2 ) खालील लाभार्थी आणि
 • उपरोक्त प्रवर्गामधील पात्र लाभार्थींना प्राधान्य देण्यात आल्यानंतर, कृषि कर्जमाफी व कर्जसहाय्य योजना, 2008 यामध्ये व्याख्या केलेल्य लहान व सिमांत भूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कामांना, शर्तीच्या अधिनतेने प्राधान्य .
 • योजनेच्या प्रमुख अटी :
 • जॉब कार्ड असणे आवश्यक
 • यंत्र सामुग्री वापरण्यास मुभा नाही.
 • ग्रामसभेद्वारे लाभार्थ्याची निवड.
 • आवश्यक कागदपत्रे :
 • अ.क्र. टप्पा अजाचा नमुना कार्यवाही करणारी यंत्रणा कालावधी
  १. नोदंणी नमुना क्र. 1 ग्रामसेवक, ग्रामपंचायत अर्ज प्राप्त झाल्यापासून एक आठवड्यात नोंदणी करणे.
  2 जॉब कार्ड नमुना क्र. 2 ग्रामसेवक, ग्रामपंचायत अर्ज प्राप्त झाल्यापासून दोन आठवड्यात जॉब कार्ड देणे.
  3 कामाची मागणी नमुना क्र. 4 ग्रामसेवक, ग्रामपंचायत मजुराचे नमुना क्र. 4 मध्ये कामाची मागणी केल्यास त्वरीत पोच पावती देणे.
  4 काम देणे नमुना क्र. 7 ग्रामसंवक, ग्रामपंचायत कामाची मागणी केल्यानंतर 15 दिवसांत काम उपलब्ध करुन देणे.
 • राज्य रोहयोंतर्गत शेततळ्याकरिता आवश्यक कागद पत्रे-
 • १) जमिनीचा 7/12
 • २) 8 अ चा उतारा
 • ३) दारिद्र्य रेषेखालील कार्ड/ आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला.
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • १. ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींकरिता रोजगार हमी योजना
 • २. महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, 1977 मधील सुधारित कलम 12 ई नुसार वैयक्तिक लाभाच्या योजना अनुदान तत्वावर प्रतिपुर्ती योजना म्हणून राबविण्यात येतात. उदा. जवाहर/धडक सिंचन विहिर योजना, रोहयोंतर्गत फळबाग लागवड, शेततळे इ.
 • ३. केंद्र शासन प्रत्येक वर्षी मजुरीचे दर ठरविते. सद्यस्थितीत मजुरीचा दर रु. 192/-
 • अर्ज करण्याची पद्धत : रोजगार आवश्यक असणाऱ्या नोंदणीकृत व्यक्तीने नमूना क्र. 4 मध्ये संबंधित ग्राम पंचायतीमध्ये अर्ज करणे आवश्यक. मजुराने किमान 14 दिवस कामाची मागणी केल्यानंतर सदर मजुराला 15 दिवसात ग्रामपंचायतीने रोजगार पुरविणे आवश्यक.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : कामाची मागणी केल्याच्या दिनांकापासून 15 दिवस.
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, रोजगार हमी योजना प्रभाग, 16 वा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मादाम काम मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-32
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: राज्य रोहयोंतर्गत “मागेल त्याला शेततळे” या कार्यक्रमासाठी htpp://aaplesarkar.maharashtra.gov.in
Total Number of Visitors
Total Number of Visitors