Government of Maharashtra

MAHA SCHEMES

logo

Shri Devendra Fadnavis Hon’ble Chief Minister

Crop Protection Schemes

 • फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप)
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप)
  योजने बद्दलचा शासन निर्णय : प्रशासकीय मान्यता
  योजनेचा प्रकार : शासन निर्णय क्र. राकृवियो-2015/प्र.क्र.327/9-अे, दिनांक-05 जानेवारी, 2016
  योजनेचा उद्देश : आंबा, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी व चिक्कू या पिकांवरील कीड, रोगांचे सर्वेक्षण करुन त्याबाबत उपाययोजनेसाठी सल्ला देणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गातील शेतकरी
  योजनेच्या प्रमुख अटी : शेतक­याकडे स्वत:चे फळबाग क्षेत्र असावे.
  आवश्यक कागदपत्रे : अर्ज, 7/12 व 8-अ उतारा
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : या योजनेंतर्गत किड सर्वेक्षकांमार्फत प्रत्यक्ष बागांना भेट देऊन किड / रोगांसंबधात निरीक्षणे घेण्यात येत आहेत. त्यानंतर राष्ट्रीय संशोधन केंद्र, कृषि विद्यापीठे यांचे मदतीने सल्ले तयार करण्यात येत असून माहिती तंत्रज्ञानाद्वारे सदरची माहिती एस.एम.एस. द्वारे व जंबो झेरॉक्स द्वारे शेतक­यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तसेच कीड/ रोगाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर गेल्यावर आपत्कालीन परिस्थितीत 50 टक्के अनुदानावर औषधे तालुकास्तरावरुन उपलब्ध करुन दिली जातात.
  अर्ज करण्याची पद्धत :
   नमुना अर्जामध्ये शेतक­याने स्वत:ची माहिती भरुन आवश्यक कागदपत्रांसह (7/12 व 8-अ उतारा) संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावा.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : माहे जुलै ते मे
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबंधीत तालुका कृषि अधिकारी
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • केळी पिकावरील करपा (सिगाटोका) रोग नियंत्रण कार्यक्रम
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : केळी पिकावरील करपा (सिगाटोका) रोग नियंत्रण कार्यक्रम
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन पत्र क्र. राकृवियो 0415/प्र.क्र. 39/राकृवियो कक्ष, मंत्रालय, मंुबई-32
  योजनेचा प्रकार : दिनांक- 30/04/2015
  योजनेचा उद्देश : केळी पिकावरील सिगाटोका रोगाचे नियंत्रण करणे
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्ग शेतकरी (केळी लागवड शेतकरी)
  योजनेच्या प्रमुख अटी : किटकनाशेक व बुरशीनाशके-
  आवश्यक कागदपत्रे : अर्ज, 7/12 व 8-अ उतारा
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : केळी करपा नियंत्रणासाठी किटकनाशके व बुरशीनाशकांचा पुरवठा करण्यात येतो व शेतक­यांच्या मागणीनुसार त्यांना तालुकास्तरावरुन किटकनाशके व बुरशीनाशक वाटप करण्यात येते.
  अर्ज करण्याची पद्धत :
   नमुना अर्जामध्ये शेतक­याने स्वत:ची माहिती भरुन आवश्यक कागदपत्रांसह (7/12 व 8-अ उतारा) संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावा.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : माहे जुलै ते मार्च
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबंधीत तालुका कृषि अधिकारी
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • जिल्हा नियोजन विकास मंडळ पुरस्कृत पिक संरक्षण योजना (डीपीडीसी)
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : जिल्हा नियोजन विकास मंडळ पुरस्कृत पिक संरक्षण योजना (डीपीडीसी)
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : उत्पादन वाढ
  योजनेचा उद्देश : फळपिके, भाजीपाला, फुलपिके, मसालेपिके, औषधी व सुगंधी वनस्पती या पिकांवरील कीड व रोग नियंत्रणासाठी औषधांचा (कीटकनाशके व बुरशीनाशके) 50 टक्के अनुदानावर पुरवठा करणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : या योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या शेतक-यांना (सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती इत्यादी ) लाभ देण्यात येतो. अनुसुचित जाती/जमातीच्या लाभार्थ्याना प्राधान्य. लाभार्थी अल्प भूधारक/सिमांतिक असल्यास प्राधान्य.
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे : अर्ज, 7/12 व 8-अ उतारा
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  अर्ज करण्याची पद्धत :
   फळपिके, भाजीपाला, फुलपिके, मसालेपिके, औषधी व सुगंधी वनस्पती या पिकांवरील कीड व रोग नियंत्रणासाठी औषधांचा (कीटकनाशके व बुरशीनाशके) 50 टक्के अनुदानावर शेतक­यांना पुरवठा करण्यात येतो.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : नमुना अर्जामध्ये शेतक­याने स्वत:ची माहिती भरुन आवश्यक कागदपत्रांसह (7/12 व 8-अ उतारा) संबंधीत कृषि विकास अधिकारी कार्यालयात सादर करावा.
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : माहे जून ते मार्च
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला पिके लागवड योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला पिके लागवड योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : उत्पादन वाढ
  योजनेचा उद्देश : आदिवासी कुटुंबाच्या आहारात जिवनसत्व व इतर आवश्यक पोषक द्रव्ये उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या भागासाठी पोष्टीक आहार योजना सुरु केली आहे. याकरिता अ, क या जिवनसत्वाची आणि लोह व खनिजाचा पुरवठा करण्याच्या फळे व भाजीपाला पिकाची आदिवासीच्या परस बागेत लागवड करुन आहार अन्नद्रव्याच्या दृष्टीने परिपूर्ण करणे
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : आदिवासी क्षेत्रातील शेतकरी
  योजनेच्या प्रमुख अटी : लाभार्थी हा आदिवासी क्षेत्रातील कुपोषणग्रस्त गावांमधील आदिवासी असावा व त्याच्या कुटंुबांकडे शेतजमिन किंवा परसबाग उपलब्ध असावी.
  आवश्यक कागदपत्रे : अर्ज, 7/12 व 8-अ उतारा
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी रु. 250/- प्रमाणे अनुदान देय आहे. लाभार्थीकडे स्वत:ची अवजारे नसल्यास प्रती लाभार्थी रु. 150/-किंमतीची फळझाडे/भाजीपाला लागवड साहित्य पुरवठा व रु. 100/- किंमतीचे अवजारांचा संच पुरविण्यात येतो.
  अर्ज करण्याची पद्धत :
   नमुना अर्जामध्ये शेतक­याने स्वत:ची माहिती भरुन आवश्यक कागदपत्रांसह (7/12 व 8-अ उतारा) संबंधीत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावा.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : माहे जून ते माहे मार्च
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबंधीत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
Total Number of Visitors
Total Number of Visitors